मुंबईः महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात गुरुवारी शिवसेनेने आपल्या पक्षातल्या १२ बंडखोर आमदारांचे विधीमंडळ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष
मुंबईः महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात गुरुवारी शिवसेनेने आपल्या पक्षातल्या १२ बंडखोर आमदारांचे विधीमंडळ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांना याची माहिती दिली. या १२ आमदारांची पक्षाच्या बैठकीला नोटीस बजाऊनही उपस्थिती नव्हती. त्याबाबत करणे दाखवा नोटीस बाजावल्याचे सावंत यांनी सांगितले.
१२ आमदारांची यादी
एकनाथ शिंदे (कॅबिनेट मंत्री) – कोपरी पाचपाखाडी, ठाणे
संदिपान भुमरे – (कॅबिनेट मंत्री) – पैठण, औरंगाबाद
अब्दुल सत्तार – (राज्यमंत्री) – सिल्लोड, औरंगाबाद
तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद
प्रकाश सुर्वे – मागाठणे, मुंबई
बालाजी किणीकर – अंबरनाथ, ठाणे
अनिल बाबर – खानापूर, सातारा
लता सोनावणे – चोपडा, जळगाव
यामिनी जाधव – भायखळा, मुंबई
संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद
भरत गोगावले – महाड, रायगड
महेश शिंदे – कोरेगाव, सातारा.
COMMENTS