भाजप नेत्याच्या फार्महाऊसमधून सहा अल्पवयीनांची सुटका

भाजप नेत्याच्या फार्महाऊसमधून सहा अल्पवयीनांची सुटका

पोलिसांनी सांगितले, की गुप्त माहितीच्या आधारे, पूर्वी अतिरेकी असलेले आणि आता राजकारणी बनलेले मेघालय भाजपचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन. माराक यांच्या मालकीच्या तुरा येथील फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला.

शिलाँग : मेघालय भाजपचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन. मारक यांच्या कथितपणे चालवल्या जाणाऱ्या तुरा येथील फार्महाऊसवर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलींची सुटका करून ७३ जणांना अटक केली. यावेळी सुमारे ४०० दारूच्या बाटल्या आणि ५०० ​​हून अधिक कंडोम जप्त करण्यात आले.

याला दुजोरा देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की तुरा येथे हे वेश्यालय चालवले जात होते. वेस्ट गारो हिल्स जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विवेकानंद सिंह यांनी सांगितले, की गुप्तचरांच्या आधारे, पूर्वी अतिरेकी असलेल्या आणि आता राजकारणी बनलेल्या मारक यांच्या मालकीच्या रिम्पू बागान या फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला.

सिंग म्हणाले, “आम्ही सहा अल्पवयीनांची (चार मुले आणि दोन मुली) सुटका केली आहे, जी बर्नार्ड मारक यांच्या मालकीच्या रिम्पू बागानमधील गलिच्छ खोल्यांमध्ये बंद अवस्थेत सापडली होती. वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने मारक आणि त्याचे सहकारी हे वेश्यागृह म्हणून चालवत होते.

ते म्हणाले की, सर्व बालकांना सुरक्षित कस्टडीसाठी आणि कायद्यानुसार आवश्यक कारवाईसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPO) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

या छाप्यात २७ वाहने, आठ दुचाकी, सुमारे ४०० दारूच्या बाटल्या, ५०० हून अधिक कंडोम आणि क्रॉसबो (धनुष्यासारखे यंत्र) आणि बाण जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अधिका-याने सांगितले की, ७३ लोकांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, फार्महाऊसमध्ये ३० लहान खोल्या आहेत.

त्यांनी शंका व्यक्त केली, की हे तेच ठिकाण आहे जिथे एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि या संदर्भात फेब्रुवारी २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानी सांगितले, की मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा रिम्पू बागान येथेच असल्याचे सांगितले होते.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, सिंह म्हणाले, “अल्पवयीन मुलीवर एका आठवड्यात अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचे कळले आहे आणि कलम ३६६ ए (अल्पवयीन मुलीची खरेदी), ३७६ (बलात्कार) आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

पीडितेने न्यायालयात सांगितले होते, की आरोपी तिला आणि तिच्या मित्राला रिम्पू बागान येथे घेऊन गेला होता. तीने सांगितले की, आरोपींनी तिथे एक खोली भाड्याने घेतली आणि तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले.

अधिका-याने सांगितले की तुरा शहरातील रहिवाशांकडून अनेक तोंडी तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या, ज्यात रिम्पू बागानमध्ये अनैतिक कृत्ये सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर येथे छापे टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते.

छाप्यादरम्यान पोलिसांना अनेक तरुण-तरुणी विना कपड्यांमध्ये सापडली आणि दारू सापडली. ते म्हणाले की, सर्व ६८ जणांना अटक करण्यात आली आहे. मालमत्तेचा व्यवस्थापक, केअर टेकर आणि तीन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की त्यांनी मारकला तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. तसेच शिलाँग सदर पोलीस ठाण्यात ताबडतोब आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. परंतु तो अटक टाळत आहे.

गारो आदिवासी स्वायत्त जिल्हा परिषदेचे मारक निवडून आलेले सदस्य आहेत. त्यांनी छाप्यांबाबत दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री कोनराड के. संगमा यांना लक्ष्य केले आहे. मारक यांनी ‘वेश्यालय’ चालवल्याचा आरोपही फेटाळून लावला.

“मुख्यमंत्री निराश झाले आहेत. कारण त्यांना माहित आहे की ते भाजपच्या दक्षिण तुरा जागेवर परभूत होत आहेत. माझ्या फार्महाऊसवरील छापा म्हणजे माझी प्रतिमा मलीन करण्याचा आणि राजकीय सूडबुद्धीचा प्रयत्न आहे,” असा दावा त्यांनी केला.  पोलिसांनी सांगितले की मारकला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

भाजप हा संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) च्या नेतृत्वाखालील सत्ताधारी मेघालय लोकशाही आघाडीचा भाग आहे.

एसपी म्हणाले की, २००० च्या दशकाच्या सुरुवातीला जोरात असलेली अतिरेकी संघटना, अचिक राष्ट्रीय स्वयंसेवी परिषद (बी) चे मारक तत्कालीन स्वयंभू अध्यक्ष होते. त्यांच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

COMMENTS