नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने रफाल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेतील तीन याचिका फेटाळल्या असल्या तरी न्यायालयाने रफाल लढाऊ विमानांची खरेदी प्रक्
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने रफाल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेतील तीन याचिका फेटाळल्या असल्या तरी न्यायालयाने रफाल लढाऊ विमानांची खरेदी प्रक्रिया आपल्या अखत्यारित नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे, त्यामुळे हा गैरव्यवहार असून त्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडूनच व्हावी, अशी काँग्रेसने मागणी केली आहे.
रफाल विमानांच्या खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, कारण ती सरकारची जबाबदारी असते, अशी काँग्रेसची पहिल्यापासूनच भूमिका आहे. त्यामुळे विमानांच्या किंमती, त्याचे होणारे करार यातूनच भ्रष्टाचार केला गेला आहे. त्यामुळे या व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फतच चौकशी करणे गरजेचे आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा रफाल विमानांच्या व्यवहाराची सखोल चौकशीच्या दृष्टीनेच दिला आहे. खुद्ध न्यायालयाने आपण या खरेदी व्यवहाराच्या चौकशीमध्ये येणार नाही असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे या व्यवहाराची चौकशी व्हावी असे न्यायालयाच्या निकालातून स्पष्टपणे सूचित होत असल्याने या भ्रष्टाचाराचे एकेक पदर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीतून बाहेर पडतील असा दावा काँग्रेसने केला आहे.
मूळ बातमी
COMMENTS