मूडीजने भारताचे गुणांकन ‘नकारात्मक’ केले

मूडीजने भारताचे गुणांकन ‘नकारात्मक’ केले

आर्थिक वृद्धी पूर्वीपेक्षा प्रत्यक्षात कमी राहणार असल्याची वाढती जोखीम या बदलामध्ये प्रतिबिंबित होते असे एजन्सीने म्हटले आहे.

सूक्ष्म-मध्यम उद्योग पॅकेज : खर्चाची झळ सरकारला नाहीच!
२०२०-२१च्या जीडीपीत ७.७ टक्क्याने घसरण
रोजगार सहभाग दरातील घसरणीकडे दुर्लक्ष करणे घातक!

मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस यांनी भारतावरचे आपले ‘आऊटलुक’ गुणांकन ‘स्थिर’ वरून ‘नकारात्मक’ असे खाली आणले आहे. आर्थिक वृद्धी पूर्वीपेक्षा प्रत्यक्षात कमी राहणार असल्याची वाढती जोखीम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गुणांकन करणाऱ्या या कंपनीने देशाचे फॉरेन इश्युअर गुणांकन Baa2 असे कायम ठेवले आहे, जे शेवटून दुसऱ्या क्रमांकाचे गुणांकन आहे.

“आर्थिक वृद्धी पूर्वीपेक्षा प्रत्यक्षात कमी राहणार असल्याची वाढती जोखीम हे या निर्णयामागचे कारण आहे. आर्थिक आणि संस्थात्मक कमजोरींवर उपाययोजना करण्यामध्ये सरकारी धोरणांची परिणामकारकता मूडीने पूर्वी अंदाज केला होता त्यापेक्षा कमी आहे, त्यामुळे अगोदरच मोठ्या प्रमाणात असलेले कर्जाचे ओझे हळूहळू वाढू शकते, हेही लक्षात घेतले गेले आहे,” असे या गुणांकन एजन्सीने एका निवेदतानत म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेला सहाय्य करण्यासाठी सरकार करत असलेल्या उपायांमुळे भारताच्या आर्थिक मंदीची खोली आणि कालावधी कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, ग्रामीण कुटुंबांवरचा दीर्घकाळ आर्थिक तणाव, नोकऱ्यांची निर्मिती कमी असणे, आणि नुकतेच बँकांव्यतिरिक्तच्या वित्तीय संस्थांमधील (NBFI) पत संकट यामुळे मंदी आणखी ठोस होण्याची शक्यता वाढली आहे, असेही त्यात म्हटले आहे.

आणखी, दीर्घकालीन कमजोरीची काही चिन्हे दिसतात का यासाठी गुंतवणूकदार भारताच्या जीडीपीवर लक्ष ठेवून असतील असे बातमीत म्हटले आहे. तसे झाल्यास आणखी नकारात्मक बदल होईल असे मूडीजने म्हटले आहे.

फिच रेटिंग्ज आणि एसअँडपी ग्लोबल रेटिंग्ज अशा इतर एजन्सींनी अजून भारतासाठीचा आऊटलुक ‘स्थिर’ असाच राखला आहे. मात्र  एसअँडपी ग्लोबल रेटिंग्जने नुकताच इशारा दिला की “भारतीय वित्तीय क्षेत्रामध्ये “संक्रमण जोखीम वाढत आहे”.

(पीटीआयकडून मिळालेल्या माहितीवरून)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: