विरोधी पक्षनेते रानील विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

विरोधी पक्षनेते रानील विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

नवी दिल्लीः आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी यूएनपी या विरोधी पक्षाचे प्रमुख रानील विक्रमसंघे यांना नियुक्त करण्याचा निर्णय रा

पीटर ब्रुक – महाभारताचा वैश्विक पट उलगडणारा रंगद्रष्टा
चिरस्थायी विकास आणि भाजप-काँग्रेसचे जाहीरनामे
पिगॅससः हंगेरीतल्या पत्रकाराचा सरकारवर खटला

नवी दिल्लीः आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी यूएनपी या विरोधी पक्षाचे प्रमुख रानील विक्रमसंघे यांना नियुक्त करण्याचा निर्णय राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी घेतला. श्रीलंकेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या नेत्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे देण्याची ही घटना घडली आहे. गुरुवारी विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली. ७३ वर्षीय रानील विक्रमसिंघे यांनी या पूर्वी चार वेळा श्रीलंकेचे पंतप्रधानपद भूषवले आहे. विक्रमसिंघे यांच्या नावाला एसएलपीपी, एसजेबी व अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने यूएनपी पक्षाचे संसदेतील संख्याबळ वाढले आहे. तीन दिवसांपूर्वी महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर नव्या राजकीय समीकरणांची जळवाजुळव करण्यासाठी बुधवारी राष्ट्रपतींनी सर्व राजकीय पक्षांची बैठक घेतली होती, त्यानंतर त्यांनी विक्रमसिंघे यांच्याशीही स्वतंत्र चर्चा केली होती.

यूएनपी हा श्रीलंकेतील सर्वात जुना पक्ष असून गेल्या निवडणुकांत या पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. या पक्षाचे प्रमुख रानील विक्रमसिंघे यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यूएनपी पक्षाला सार्वत्रिक निवडणुकांत मिळालेल्या मतांच्या आधारावर संसदेत सदस्य पाठवण्याची संधी मिळाली होती. त्यावर विक्रमसिंघे संसदेत पुन्हा आले होते.

विक्रमसिंघे हे श्रीलंकेची अर्थव्यवस्था रुळावर आणतील व त्यासाठी नवी धोरणे आखतील असा राजकीय प्रवाह आहे. त्यांना सर्व राजकीय पक्षांचे समर्थनही प्राप्त झाले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: