श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे विजयी

श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे विजयी

अनेक आंदोलक विक्रमसिंघे यांना राजपक्षे कुटुंबाचे सहकारी म्हणूनच पाहतात.

एक लाख एलआयसी कर्मचाऱ्यांचा वॉक आऊट
जिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला
बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड : गेहलोत

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या संसदेत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कार्यवाहक अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी १३४ मतांनी विजय मिळवला आहे. दुल्लस अल्लापेरुमा यांना ८२  आणि अनुरा के. दिसानायके यांना तीन मते मिळाली.

बुधवारी सकाळी झालेल्या निवडणुकीत, श्रीलंकेच्या संसदेतील २२५ पैकी २२३ खासदारांनी मतदान केले, तर दोन खासदारांनी मतदान केले नाही. टाकलेल्या मतांपैकी ४ मते अवैध म्हणून नाकारण्यात आली, त्यामुळे २१९ मते ग्राह्य धरण्यात आली.

मतदान करणारे दोन खासदार, समनप्रिया हेरथ आणि डी. वीरासिंघे हे रुग्णालयातून आले होते. तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. माजी पंतप्रधान आणि अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यासह, गोटाबाया राजपक्षे यांचे दोन भाऊ तसेच एक पुतण्याही यावेळी उपस्थित होता.

गुप्त मतदानाद्वारे मतदान घेण्यात आले.

अनेक आंदोलक विक्रमसिंघे यांना राजपक्षे कुटुंबाचे सहयोगी म्हणूनच पाहतात आणि त्यांच्या खाजगी घरावर आणि कार्यालयावरही आंदोलन करून लोकांनी त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

गोटाबाया राजपक्षे यांनी मालदीवमध्ये लष्करी विमानाने पळ काढल्यानंतर आणि त्यानंतर तिथून सिंगापूरला गेल्यानंतर सहा वेळा पंतप्रधान राहिलेले विक्रमसिंघे हे कार्यवाहक अध्यक्ष झाले होते. आता त्यांची श्रीलंकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे या आंदोलनाला पुन्हा एकदा वाव मिळण्याची शक्यता आहे.

विक्रमसिंघे हे अध्यक्षपदासाठी स्पष्टपणे आघाडीवर होते, परंतु विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदास यांनी माघार घेतल्याने, माजी माध्यम मंत्री दुल्लास अलाहपेरुमा हे अधिक मजबूत दावेदार म्हणून पुढे येतील अशी अपेक्षा होती.

तामिळ नॅशनल अलायन्ससह अनेक स्वतंत्र आणि अल्पसंख्याक राजकीय पक्षांनी प्रेमदासांच्या माघारीपासून अलाहपेरुमा यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांना पोदुजाना पेरामुना (SLPP) च्या बहुसंख्य खासदारांचा पाठिंबा नाही.

बुधवारी सकाळी, एका वृत्तपत्रात बातमी आली की भारतीय उच्चायुक्तालयाने तामिळ नॅशनल अलायन्स(TNA)चे नेते एम. ए. सुमनिधरन यांना विक्रमसिंघे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात मतदान करण्यास सांगितले होते. यानंतर लगेचच श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी या वृत्ताचे खंडन केले.

शेकडो पोलीस, निमलष्करी आणि लष्करी तुकड्या सुमारे १३ किमी परिसरात संसद भवनाभोवती तैनात करण्यात आल्या होत्या आणि संसदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर किमान तीन बॅरिकेड्स होते. स्पीड बोटीमधील सुरक्षा कर्मचारी इमारतीच्या सभोवतालच्या तलावाभोवती गस्त घालत होते आणि लष्करी जीप आणि चिलखती वाहने परिघामध्ये उभी होती.

आंदोलकांनी या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रपतींच्या सचिवालयासह अधिकृत अध्यक्षांच्या निवासस्थानावर कब्जा केला होता आणि तत्कालीन विद्यमान गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0