काश्मीरात पोलिस, त्याची पत्नी व मुलीची दहशतवाद्यांकडून हत्या

काश्मीरात पोलिस, त्याची पत्नी व मुलीची दहशतवाद्यांकडून हत्या

श्रीनगरः जम्मू व काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी रात्री ११च्या सुमारास काही दहशतवाद्यांनी विशेष पोलिस अधिकारी फैयाज अहमद यांच्या घरात घुसून त्या

जंगलांना लागणारे वणवे व त्यामागील कारणे
करोना व्हायरस – शरीरात कसा वागतो?
सार्वजनिक आरोग्य आणि कोकाकोलाचे हितसंबंध

श्रीनगरः जम्मू व काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी रात्री ११च्या सुमारास काही दहशतवाद्यांनी विशेष पोलिस अधिकारी फैयाज अहमद यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबियांवर केलेल्या गोळीबारात फैयाज अहमद, त्यांची पत्नी व मुलगी ठार झाले.

फैयाज अहमद अवंतीपोरनजीक हरिपारिगाम येथे राहात होते. पोलिसांनी या घटनेबाबत सांगितले की, काही दहशतवादी फैयाज अहमद यांच्या घरात रविवारी रात्री ११च्या सुमारास घुसले व त्यांनी गोळीबार केला. या घटनेनंतर दहशतवादी पळून गेले. जखमी फैयाज अहमद, त्यांची पत्नी व मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण मध्येच अहमद यांचा मृत्यू झाला तर पत्नी रजा बेगम व मुलगी राफिया यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेआधी जम्मूमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोनद्वारे दोन स्फोट घडवण्यात आले. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

या घटनेआधी गेल्या आठवड्यात श्रीनगरमधील ईदगाह व नौगाम भागात दहशतवाद्यांनी एक पोलिस निरीक्षक, हवालदार यांची हत्या केली होती. त्याच बरोबर बर्बर शाह भागात दहशतवाद्यांनी ग्रेनेड बॉम्ब टाकला होता. यात एक नागरिक ठार झाला होता.

दरम्यान फैयाज अहमद यांच्या कुटुंबियाची झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी असून दहशतवाद्यांचे हे कृत्य भेकड असल्याची प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनीही या घटनेचा निषेध करायला आपल्याकडे कठोर शब्द नसल्याची खंत बोलून दाखवली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: