राज्य बँक घोटाळा : अजित पवारांसह बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल

राज्य बँक घोटाळा : अजित पवारांसह बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) सुमारे २५ हजार कोटी रु.च्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित

युती आणि आघाड्यांची अभद्रता आणि वास्तव
मोदींच्या उपस्थितीत कोश्यारींवर अजित पवारांचा निशाणा
म्युकरमायकोसिसवरचे उपचार म. फुले योजनेतून होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) सुमारे २५ हजार कोटी रु.च्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते – पाटील, मधुकर चव्हाण, आणि शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांविरोधात माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने पाच दिवसांत अजित पवार यांच्यासह अन्य ५० नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी एमआरए पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ४०९, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या नेत्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतून आपल्या मर्जीतील संस्था व व्यक्तींना नियमबाह्य कर्जे दिली होती. त्यामुळे ही बँक अडचणीत आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी एका जनहित याचिकेद्वारे केला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नियमबाह्य कर्जवाटप केल्याने या बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून प्रशासक आणून बसवावा लागला. पण त्यानंतर नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इ.चे अहवाल असूनही या नेत्यांविरोधात काहीच कारवाई झाली नसल्याचे या याचिकेत म्हटले होते.

या आर्थिक प्रकरणात सुरिंदर अरोरा यांचा जबाब गेल्या जानेवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी नोंदवून घेतला होता पण त्यावर काहीच कारवाई पोलिसांनी केली नव्हती. पोलिसांनी तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यावर उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. गेल्या गुरुवारी मात्र उच्च न्यायालयाने या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

या बँक घोटाळ्यातील आरोपींच्या विरोधात सकृतदर्शनी ‘विश्वसनीय पुरावे’ आहेत, असे मत न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0