नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्यातील एक आरोपी माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्यातील एक आरोपी माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली.
सोमवारी चिदंबरम यांनी अंतरिम जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. सीबीआयने अटक केल्यानंतर या याचिकेला काहीच अर्थ उरत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आणि जामीनासाठी सीबीआय न्यायालयात अर्ज करा असे सांगितले. त्यानंतर सीबीआय न्यायालयाने त्यांना ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्या दिवशी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
COMMENTS