मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ८० हजार फेक अकाउंट

मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ८० हजार फेक अकाउंट

नवी दिल्लीः बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिस यांची बदनाम

मोदीसे ज्यादा जेटली ‘गरम’
भाजपची ७५ लाख रोजगार कार्डची घोषणा मागे
बिहारमध्ये २ उपमुख्यमंत्री, पहिल्यांदाच महिलेला संधी

नवी दिल्लीः बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिस यांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर सुमारे ८० हजाराहून अधिक बनावट खाती उघडल्याचे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला आढळून आले आहे.

सोशल मीडियावरच्या या बनावट खात्यांसंदर्भात पोलिसांनी एक अहवाल तयार केला आहे. सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा कांगावा करत #justiceforsushant व  #SSR हे दोन ट्रेंड सोशल मीडियावर सुरू केले होते. हे ट्रेंड इटाली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रुमानिया व फ्रान्स येथून चालवले जात होते, असे पोलिसांना आढळून आले आहे.

ट्रेंड वाढत जावे म्हणून परदेशी अकाउंटचा नेहमीच वापर केला जात असतो. सुशांतच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी हे तंत्र वापरले गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांनी #justiceforsushant, #sushantsinghrajput आणि #SSR हे तिन्ही ट्रेंड परदेशातून चालवले जात असल्याचा दावा केला आहे व यात अधिक माहितीही मिळत असल्याचे एका पोलिस अधिकार्याने सांगितले.

या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांनी सायबर सेलला बनावट खात्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले असून संबंधितांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहे.

मुंबईत पसरलेला कोरोनाचा सामना करण्यासाठी मुंबई पोलिस आपल्या जीवाची बाजी लावत होते. या महासाथीत ८४ पोलिसांचा मृत्यू झाला असून ६ हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न होता, अशी प्रतिक्रिया एका पोलिस अधिकाराने दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: