मुंबईः कोरोना महासाथ पसरवण्यासंदर्भात पोलिसांकडून कोणतेही योग्य पुरावे दाखल न झाल्याने व या नागरिकांनी कोरोना पसरवला आहे असे सिद्ध न करता आल्याने दोन
मुंबईः कोरोना महासाथ पसरवण्यासंदर्भात पोलिसांकडून कोणतेही योग्य पुरावे दाखल न झाल्याने व या नागरिकांनी कोरोना पसरवला आहे असे सिद्ध न करता आल्याने दोन वेगवेगळ्या प्रकरणातील तब्लीगी जमाती संबंधित २० परदेशी नागरिकांना मुक्त करण्याचे आदेश सोमवारी मुंबईतील जिल्हादंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.
या २० आरोपींपैकी १० इंडोनेशियाचे तर अन्य १० जण किरगिझीस्तानचे नागरिक आहेत. या २० जणांना कोरोनाचा संसर्ग पसरवल्याच्या दोन वेगळ्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांच्यावर मानवी हत्येचे त्याच बरोबर व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप लावण्यात आले होते. डीएन नगर पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले होते.
काही पोलिस खबर्यांनी या परदेशी नागरिकांवर ते कोरोनाची साथ पसरवत असल्याचा व हे नागरिक खुलेआम फिरत असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता आणि तशी माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तब्लीगी जमातीशी संबंधीत २० परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते.
पण गेल्या ऑगस्टमध्ये या २० तब्लिगींवरचे हत्या करण्याचे आरोप पोलिसांनी मागे घेतले होते. या नागरिकांवर लावण्यात आलेले आरोप आपण सिद्ध करू शकलो नाही, अशी कबुली पोलिसांनी दिली होती.
७ ऑक्टोबर रोजी या सर्व २० तब्लिगींवरचे आरोप न्यायालयाने रद्द केले व त्यांच्यावर मुंबई पोलिस कायद्यांतर्गत महासाथीच्या काळातील सार्वजनिक शिस्त न पाळल्याचे गुन्हे कायम ठेवले होते.
पण न्यायालयीन सुनावणीदरम्यान या तब्लिगींनी आपल्या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली होती असे दिसून आले. तसे लॉकडाऊनमध्ये स्थानिक व परदेशी प्रवासास बंदी असल्याने आपण घरी जाऊ न शकल्याने एका मशिदीत राहात असल्याचे स्थानिक प्रशासन व पोलिसांना कळवले होते, हे सिद्ध झाले. त्यानंतर न्यायालयाने या सर्वांची सुटका केली.
मूळ बातमी
COMMENTS