मुल्ला बरादरकडे अफगाणिस्तानची सूत्रे जाण्याची शक्यता

मुल्ला बरादरकडे अफगाणिस्तानची सूत्रे जाण्याची शक्यता

रॉयटर्सः अफगाणिस्तानातील नवे सरकार तालिबानचा सह-संस्थापक म्हणून ओळखले जाणारे मुल्लाह बरादार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दहशतवादामुळे उध्वस्त झालेली अफगाणिस्तानची सामाजिक-राजकीय व अर्थव्यवस्था त्यांना नव्याने उभी करावी लागणार आहे. बरादर तालिबानचे राजकीय नेतृत्व सांभाळत असून ते लवकरच तालिबानचे संस्थापक मुल्ला ओमर यांचा मुलगा मुल्लाह मोहम्मद याकूब व शेर मोहम्मद अब्बास स्टॅनेकझी यांच्या चर्चा करून सरकार स्थापन करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

तालिबानचे अनेक बडे राजकीय नेते काबूलमध्ये दाखल होत असून नवे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली वेगाने सुरू होत असल्याचे तालिबानच्या एका अधिकार्याने रॉयटर्सला सांगितले.

१५ ऑगस्टला तालिबानने काबूल ताब्यात घेत अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले असले तरी तालिबानला उत्तरेकडील पंजशीर खोर्यातून मोठ्या प्रमाणात विरोध असल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. पंजशीर खोर्यात तालिबान व अहमद मसूद यांच्यात समर्थकांमध्ये चकमकी सुरू आहेत. या दोघांमध्ये सहमती घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण त्याला यश आलेले नाही.

अफगाणिस्तानला मोठ्या आर्थिक मदतीची गरज

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले असले तरी नव्या सरकारकडे अद्याप उध्वस्त अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या कोणत्याही योजना दिसत नाहीत. तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानातून लाखो नागरिकांचे स्थलांतर होताना दिसत आहे. या स्थलांतरितांना मानवतावादी भूमिकेतून आसरा व अन्न-पाणी- रोजगार देण्याची तातडीची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांनी अद्याप अफगाणिस्तानसाठी योजना जाहीर केलेली नाही. अमेरिकेनेही अफगाणिस्तानचे ताब्यात घेतलेले अब्जावधी रुपये किमतीचे सोने, अन्य गुंतवणूक, परकीय चलन तालिबानला दिलेले नाही. ही गोठवलेली संपत्ती बायडन सरकार केव्हा देणार याबाबत कोणतीही स्पष्टता दिसत नाहीत.

मूळ बातमी

COMMENTS