अफगाणिस्तान : जी ७ देशांची तातडीची बैठक

अफगाणिस्तान : जी ७ देशांची तातडीची बैठक

अफगाणिस्तानच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जी ७ देशांची तातडीची बैठक बोलावली आहे. अफगाणिस्तानच्या संदर्भात संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अफगाणिस्तान आता ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’
महिलांना संपूर्णपणे झाकून घेण्याचा तालिबानचा आदेश
काबूलमध्ये अडकलेले १७० भारतीय मायदेशी परत

अफगाणिस्तानच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जी ७ देशांची तातडीची बैठक बोलावली आहे. अफगाणिस्तानच्या संदर्भात संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने काबूलवर वर्चस्व मिळविल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दूरध्वनीवर चर्चा केली होती. त्यानंतर आता कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन व अमेरिका, जर्मनी, इटली, जपान या जी ७ राष्ट्रांची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये संयुक्त धोरण ठरविले जाणार आहे.

‘अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तातडीने येत्या २४ ऑगस्टला जी ७ देशातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करणे गरजेचे आहे. सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करणे, मानवतावादी संकट टाळणे, तसेच अफगाणिस्तानातील नागरिकांचे गेल्या २० वर्षातील जीवनमान सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.’ अशा आशयाचे ट्विट जॉन्सन यांनी केले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने काबूल घेतल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे अफगाणिस्तानातील परिस्थितीवर जागतिक पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत. संयुक्त राष्ट्रामध्येही सुरक्षा परिषदेमध्ये चर्चा होत आहे.

दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची विमानतळावर गर्दी झाली आहे. अशातच तालिबानी बंदूक धाऱ्यांनी हवेत गोळीबार केल्याने गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0