एकनाथ शिंदे सरकारने विश्वास ठराव जिंकला

एकनाथ शिंदे सरकारने विश्वास ठराव जिंकला

मुंबई : एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावावर १६४ इतकी मते पडल्याने त्यांनी हा ठराव जिंकला. त्यांच्या विरोधात ९९ इतकी मते

बाबरी पाडण्यासाठी करसेवा केल्याचा फडणवीसांचा दावा
मध्यरात्रीचा ‘महा’गोंधळ
ब्लू स्टार कारवाईला ३८ वर्षे पूर्ण; सुवर्णमंदिरात खलिस्तानचे नारे

मुंबई : एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावावर १६४ इतकी मते पडल्याने त्यांनी हा ठराव जिंकला. त्यांच्या विरोधात ९९ इतकी मते पडली.

सुधीर मुनघंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर विस्वस व्यक्त करणारा प्रस्ताव मांडला. त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. अगोदर आवाजी मतदान घेण्यात आले. मात्र मतविभागणीची मागणी झाल्याने मतदान घेण्यात आले. त्यात शिंदे-भाजपला इतकी मते पडली.

महाविकास आघाडीची इतकी मते सरकारच्या विरोधात पडली. महाविकास आघाडीचे विजय वडेट्टीवार आणि अशोक चव्हाण हे विधानसभा आवारात उशिराने पोहोचल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

समाजवादी पक्ष आणि एमआयएम अशी एकूण ३ मते तटस्थ राहिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्याचे म्हटले.

एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना फडणवीस म्हणाले, “आम्ही एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हे सरकार बदल्याच्या आणि सूडाच्या भावनेने काम करणार नाही. पूर्वी नेते लोकांना उपलब्ध होत नव्हते आता मात्र मुख्यमंत्री उपलब्ध होतील.”

अजित पवार म्हणाले, फडणवीस यांच्या भाषणात नेहमीचा जोष नव्हता. सतत शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचे का सांगावे लागत आहे, याचे आत्मपरीक्षण करावे. राज्यपाल अचानक अॅक्शन मोडमध्ये आलेले दिसतात. शिवसेनेतून फुटलेले मात्र कधीच निवडून येत नाहीत, हा इतिहास आहे. शिवसैनिक हा नेत्यांबरोबर जात नाही. कमी आमदारांचा नेता मुख्यमंत्री होतो, यात काहीतरी काळेबेरे आहे.

कॉँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, की कोरोना आणि इतर संकटे असली तरी महाविकास आघाडीच्या सरकारने सर्व पातळ्यांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम केले. तुम्ही काय इतिहास लिहिणार आहात, याच्यावर लक्ष ठेवा असेही थोरात यांनी शिंदे यांना सुनावले. सत्तेचा खेळ सुरू असताना सामान्य माणसाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, असे थोरात म्हणाले.

शिवसेनेचे नेते भास्कर जाधव म्हणाले, की शिवसेनेत आज काय सुरू आहे, कोण कोणावर वार करणार आहे, याचा विचार करा. महाराष्ट्रात महाभारत आणि पानिपत घडणार आहे आणि दिल्लीचे बादशाह म्हणजे भाजप आहे. सगळ्या मराठी माणसांच्या पाठीमागे तुम्ही इडी लावली आहे, यातून काय साधणार आहात. भाजपकडे पाहून जाधव म्हणाले, की यांचा एककल्ली कार्यक्रम हा शिवसेना संपवण्याचा आहे, हे लक्षात ठेवावे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0