‘लडाखमध्ये विकासासाठी फारुख अब्दुल्लांना समर्थन’

‘लडाखमध्ये विकासासाठी फारुख अब्दुल्लांना समर्थन’

कारगीलः लडाखचा विकास व तेथील स्थानिक प्रशासनाच्या भल्यासाठी ‘लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल’मध्ये (एलएएचडीसी) फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन

‘फोर्ड’चे भारतातील २ प्रकल्प बंद होणार
अरुण खोपकर: आपले आणि परके 
‘नैसर्गिक प्रयोग’ पद्धतीसाठी तीन अर्थतज्ज्ञांना नोबेल

कारगीलः लडाखचा विकास व तेथील स्थानिक प्रशासनाच्या भल्यासाठी ‘लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल’मध्ये (एलएएचडीसी) फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला भाजपचे समर्थन आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे लडाखमधील खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी शनिवारी दिली. हा पाठिंबा जम्मू व काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्याअगोदर घेतला होता, या पाठिंब्याचा अर्थ या पक्षाच्या वैचारिक प्रणालीशी आपला पक्ष सहमत आहे किंवा त्यांच्याशी वैचारिक समझोता केला आहे, असा होत नाही, असा युक्तीवाद नामग्याल यांनी केला.

गेल्या आठवड्यात भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील सर्व विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या गुपकार आघाडीवर हल्ला करत या आघाडीला गुपकार गँग असे संबोधले होते. हे सर्व विरोधी पक्ष पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेत असल्याचाही त्यांनी आरोप केला होता.

पण लडाखमध्ये खुद्ध भाजपच नॅशनल कॉन्फरन्सच्या हातात हात घालून सत्तेत असल्यावरून भाजपच्या दुटप्पीपणावर टीका झाली होती. त्यावर पक्षाची बाजू सांभाळताना नामग्याल यांनी एलएएचडीसी-कारगीलमध्ये भाजप पुढील ५ वर्षे आपला कार्यकाल पुरा होईपर्यंत नॅशनल कॉन्फरन्सला समर्थन देत राहील असे स्पष्ट केले.

एलएएचडीसीमध्ये २६ निर्वाचित सदस्यांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे १०, काँग्रेसचे ८, भाजपचे ३ व अपक्ष ५ सदस्य असून ४ सदस्यांना थेट नियुक्त केले जाते.

२०१८च्या कारगील पर्वतीय परिषद निवडणुकांमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नॅशलन कॉन्फरन्सने पहिल्यांदा काँग्रेसशी युती केली होती.

२०१९मध्ये लोकसभा निवडणुकांनंतर नॅशलन कॉन्फरन्स व काँग्रेसने आघाडी तोडली. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने सत्तेत राहण्यासाठी पीडीपीचे २ व अपक्ष ४ सदस्यांच्या मदतीने सत्ता राखली. पण काही महिन्यांनी पीडीपीचे २ सदस्य भाजपकडे गेले व भाजपने नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0