दि कराड जनता बँकेचा परवाना रद्द

दि कराड जनता बँकेचा परवाना रद्द

दि कराड जनता सहकारी बँकेचा परवाना सोमवारी रिझर्व्ह बँकेने अखेर रद्द केला. तीन वर्षांपूर्वी या बँकेच्या आर्थिक व्यवहारात अनियमता, गैरव्यवहार आढळल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध घातले होते. आता या बँकेचाच परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेच्या ९९ टक्के ठेवीदारांना ५ लाख रु.पर्यंतचे विमा संरक्षण मिळणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ज्यांच्या ठेवी ५ लाख रु.च्या आत असतील त्यांना येत्या तीन महिन्यात पैसे परत मिळतील, असे बँकेवर नियुक्त उपनिबंधक मनोहर माळी यांनी सांगितले.

या बँकेचे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे २९ शाखा असून ३२ हजाराहून अधिक खातेदार आहेत.

नोव्हेंबर २०१७मध्ये सुमारे ३१० कोटी रु.चा अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेवर निर्बंध घातले होते. या प्रकरणात पोलिसांनी बँकेच्या संचालक मंडळासह काही अधिकार्यांवर गुन्हे दाखल केले होते. पण अजून खातेदारांना न्याय मिळालेला नाही. या बँकेचा सातारा जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव होता. राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांचे या बँकेवर वर्चस्व आहे.

COMMENTS