कायद्यावर सरकार ठाम, बैठक निष्फळ

कायद्यावर सरकार ठाम, बैठक निष्फळ

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन कायद्यांसंदर्भात बुधवारी होणारी सरकार व शेतकरी संघटनांमधील बैठक रद्द झाली. सरकार हे तीन कायदे मागे घेणार नाही

लखिमपुर हिंसाचारः मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४५ लाख
तटबंद्यांना लोकशाहीत जागा नाही!
शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिलेला धडा

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन कायद्यांसंदर्भात बुधवारी होणारी सरकार व शेतकरी संघटनांमधील बैठक रद्द झाली. सरकार हे तीन कायदे मागे घेणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. सरकार या तीन शेती कायद्यांसंदर्भात बुधवारी आपला प्रस्ताव शेतकरी संघटनांपुढे ठेवणार असून त्या प्रस्तावावर शेतकरी संघटना चर्चा करतील, असे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंग चुडानी यांनी सांगितले.

मंगळवारी भारत बंद यशस्वी झाल्यानंतर संध्याकाळी अमित शहा यांनी अचानक १३ शेतकरी संघटनांच्या नेत्यांना चर्चेस बोलावले होते. या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारने कायद्यात काही दुरुस्त्या करु असा प्रस्ताव ठेवला होता, पण शेतकरी संघटनांनी संपूर्ण कायदेच रद्द करण्याचा आग्रह धरला. आता सरकारने प्रस्ताव दिल्यानंतर बैठक बोलावल्यास ती होईल, असे चुडानी यांनी सांगितले.

दरम्यान बुधवारी ५ विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. यात काँग्रेसतर्फे राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी व अन्य दोन नेत्यांचा समावेश आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0