मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मंगळवारी पुन्हा विक्रम प्रस्थापित करत लस मात्रांचा ४ कोटींचा टप्पा पार केला. मंगळवार दुपारपर्यंत झा
मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मंगळवारी पुन्हा विक्रम प्रस्थापित करत लस मात्रांचा ४ कोटींचा टप्पा पार केला. मंगळवार दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेची संख्या चार कोटींवर गेली. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ६ लाख ९९ हजार ३३९ तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ९३ लाख २५ हजार ३६२ एवढी आहे. मंगळवार दुपारपर्यंत राज्यात १ लाख २० हजार नागरिकांना लस देण्यात आली.
COMMENTS