बँकॉक/नवी दिल्लीः कोविड-१९ महासाथीचे तिसरे वर्ष सुरू झाले असून या महासाथीत जगभरात आतापर्यंत सुमारे ६० लाख जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जॉन हॉपकिन्स व
बँकॉक/नवी दिल्लीः कोविड-१९ महासाथीचे तिसरे वर्ष सुरू झाले असून या महासाथीत जगभरात आतापर्यंत सुमारे ६० लाख जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे. या विद्यापीठाकडून जगभरातील कोविड संबंधित आकडेवारी संकलित व विश्लेषित केली जात आहे. जॉन हॉपकिन्सच्या मते कोविड-१९च्या जागतिक महासाथीत आजपर्यंत मृतांचा आकडा ५९,९९,२१८ इतका झाला असून कोरोना संक्रमणाची आकडेवारी ४४,६२,७८,९८९ इतकी झाली आहे.
कोरोनाचे संक्रमण आता प्रशांत महासागरातील काही बेटांवरही पोहचले असून तेथे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
हाँगकाँग सरकारने आपल्या ७५ लाख लोकसंख्येच्या गेल्या महिन्यात तीन वेळा चाचण्या केल्या आहेत. तर पोलंड, हंगेरी, रुमानिया व पूर्व युरोपमधील देशांमध्ये कोविड मृत्यू दर अधिक आढळला आहे. त्यात या देशांमध्ये युक्रेनमधील सुमारे १० लाखाहून अधिक निर्वासित आले आहेत. या कारणांमुळे लसीकरण मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या असून कोरोना संक्रमणाचे नवे रुग्ण व मृत्यूही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेत कोरोना संक्रमणाची जबरदस्त लाट आली आहे. तेथे आजपर्यंत मृतांचा आकडा ९ लाख ५८ हजार ६२१ इतका नोंद झाला आहे.
कोरोनाचा मृत्यू दर वाढण्यामागे लस न घेतलेल्यांची संख्या अधिक असल्याचे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे मत आहे. कोरोनाची लागण व त्यातून निर्माण होणारे गंभीर आजार व मृत्यूला कारणीभूत संबंधित रुग्णाने कोरोना प्रतिबंधित लस न घेतल्याचे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे मत आहे.
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर २०२०मध्ये पहिल्या सात महिन्यात जगभरात १० लाख मृत्यूंची नोंद झाली होती. हा आकडा गेल्या चार महिन्यात १० लाखांवर आला आहे. २०२१च्या ऑक्टोबरपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा ५० लाखाच्या पुढे गेला होता. आता तो ६० लाखांवर आला असून हा आकडा बर्लिन व ब्रुसेल्स या शहरांच्या एकूण लोकसंख्येएवढा आहे.
दरम्यान भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४,३६२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशांत आजपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ४ कोटी २९ लाख ६७ लाख ३१५ इतकी झाली असून मृतांचा आकडा ५ लाख १५ हजार १०२ इतका झाला आहे.
भारतात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात १ लाख ४३ हजार ७४० इतके झाले असून त्या पाठोपाठ केरळमध्ये ६६, १८०, कर्नाटकात ३९,९९१, तमीळनाडूत ३८,०१५, दिल्लीमध्ये २६,१३४, उ. प्रदेशात २३,४७५ व प. बंगालमध्ये २१,१८० जणांचा मृत्यू झाला आहे.
२०२१ या वर्षांत कोणत्या महिन्यात किती मृत्यू झाले याची आकडेवारी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
मूळ बातमी
COMMENTS