नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याविरोधात शेतकर्यांचे सुरू असलेल्या आंदोलनात रोज नवे पेच निर्माण होत आहे. सरकार हे तीन कायदे मागे घ
नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याविरोधात शेतकर्यांचे सुरू असलेल्या आंदोलनात रोज नवे पेच निर्माण होत आहे. सरकार हे तीन कायदे मागे घेत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांनी येत्या २६ जानेवारी रोजी पुकारलेल्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात दिल्ली पोलिस व शेतकरी संघटना यांच्यातील चर्चा गुरुवारी निष्फळ ठरली. शेतकरी संघटनांनी आपल्या ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग दिल्लीच्या बाहेरचा रिंग रोड निश्चित केला असून याच मार्गावर आमची रॅली निघणार असल्याचा ठाम निश्चय त्यांनी पोलिसांसोबत झालेल्या चर्चेत पुढे ठेवला. तर दिल्ली पोलिसांनी ही ट्रॅक्टर रॅली दिल्लीच्या बाहेर कुंडली-मानेसर पलवल एक्स्प्रेस वेवर काढावी असा तोडगा काढला.
पण पोलिसांच्या या तोडग्यावर शेतकरी नेते सहमत झाले नाहीत. आम्ही दिल्लीत शांततापूर्ण ट्रॅक्टर रॅली काढणार आहोत व ही रॅली येथेच निघेल असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.
दोन दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकर्यांची ट्रॅक्टर रॅली निघू नये यासाठी न्यायालयाने आदेश काढावेत अशी मागणी करणारी याचिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. पण न्यायालयाने या विषयावर आम्ही आदेश देऊ शकत नाही व हा विषय दिल्ली पोलिसांच्या अखत्यारितील असल्याचे सांगून ही याचिका मागे घ्यावी असे सरकारला सांगितले. त्यानंतर सरकारने ही याचिका मागे घेतली.
मूळ बातमी
COMMENTS