चीन नव्हे तर अमेरिकेशी भारताचा सर्वाधिक व्यापार

चीन नव्हे तर अमेरिकेशी भारताचा सर्वाधिक व्यापार

नवी दिल्लीः गेल्या दशकभरात भारताचा सर्वाधिक व्यापार चीनशी होत असे पण २०२१-२२ या आर्थिक वर्षांत चीनची जागा अमेरिकेने घेतली आहे. वाणिज्य खात्याने दिलेल्

मुत्सद्देगिरीला पाक आणि चीनची किनार
चीनच्या ‘फॉब्स’ चाचणीमुळे अमेरिकेला हादरा?
भारतीय ठाण्यानजीक चीनचे शस्त्रसज्ज सैन्य तैनात

नवी दिल्लीः गेल्या दशकभरात भारताचा सर्वाधिक व्यापार चीनशी होत असे पण २०२१-२२ या आर्थिक वर्षांत चीनची जागा अमेरिकेने घेतली आहे. वाणिज्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका व भारतादरम्यानचा २०२१-२२ मधील व्यापार हा ११९.४२ अब्ज डॉलर इतका पोहचला आहे. या पूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षांत हा व्यापार ८०.५१ अब्ज डॉलर इतका होता.

२०२१-२२ या काळात भारताची अमेरिकेला होणाऱी निर्यातही वाढली आहे. २०२०-२१ या काळात अमेरिकेला भारताची होणारी एकूण निर्यात २९ अब्ज डॉलर होती ती आता २०२१-२२ या काळात ४३.३१ अब्ज डॉलर इतकी वाढली आहे.

चीन सोबत भारताचा व्यापार कमी झालेला नाही पण त्यात दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. भारत-चीन दरम्यान २०२१-२२ या काळातला व्यापार ११५.४२ अब्ज डॉलर तर २०२०-२१ या काळात ८६.४० अब्ज डॉलर इतका होता.

चीन सोबतच्या निर्यातीत गेल्या दोन वर्षात किंचिंत वाढ झालेली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत चीनशी निर्यात २१.१८ अब्ज डॉलर होती ती २०२१-२२ या काळात २१.२५ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. चीनसोबतच्या आयातीत मात्र वाढ झालेली आहे. २०२०-२१ मध्ये आयात ६५.२१ अब्ज डॉलर होती ती आता २०२१-२२ या काळात ९४.१६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

भारत व अमेरिकेदरम्यान वाढलेला व्यापार अजून काही वर्षे तसाच राहील असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. कारण गेल्या काही काळात अमेरिका व भारतदरम्यान अनेक बडे व्यापार करार झालेले आहेत. अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांनी चीनसोबतचे आपले करार बंद करून भारताला महत्त्व देण्यास सुरूवात केली आहे. त्यात द. आशियाच्या राजकारणात अमेरिकेने भारताच्या पारड्यात बरेच वजन टाकत चीनला शह दिला आहे. त्याचे परिणाम व्यापारवृद्धीमध्ये दिसून येत असल्याचे इंडियन एक्सपोर्ट संघटनेचे उपाध्यक्ष खालिद खान यांनी सांगितले.

भारताची अमेरिकेला होणारी निर्यात प्रामुख्याने पेट्रोलियम पॉलिश हिरे, औषधी उत्पादने, ज्वेलरी, लाइट ऑइल व पेट्रोलियम, शिंपले यात असून आयात पेट्रोलियम पदार्थ, कच्चे हिरे, एलएनजी, सोने, कोळसा, भंगार माल, बदाम या वस्तूंमध्ये होत असते.

२०१३-१४ ते २०१७-१८ व २०२०-२१ या कालावधीत भारत चीनचा सर्वात मोठा व्यापारदार देश होता. त्या आधी संयुक्त अरब अमिरात हा चीनचा व्यापारदार देश होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0