ट्रम्प यांच्या महाभियोग चौकशीस संसदेची मंजुरी

ट्रम्प यांच्या महाभियोग चौकशीस संसदेची मंजुरी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग लावण्याअगोदर त्यांची चौकशी करणाऱ्या प्रस्तावास गुरुवारी डेमोक्रेटिक पक्षाचे बहुमत असले

इराण –अमेरिका तणावामुळे आखाती युद्ध घडेल का?
दोस्त की नवा सहकारी, भारतासमोर आव्हान
कमला हॅरिसः डेमोक्रेट्सतर्फे उपाध्यक्षपदाच्या उमेदवार

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग लावण्याअगोदर त्यांची चौकशी करणाऱ्या प्रस्तावास गुरुवारी डेमोक्रेटिक पक्षाचे बहुमत असलेल्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने मंजुरी दिली. हा प्रस्ताव २३२ विरुद्ध १९६ मतांनी मंजूर करण्यात आला. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने ट्रम्प यांची सार्वजनिक सुनावण्यांद्वारे चौकशी केली जाईल. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी युक्रेनवर दबाव आणण्याचे प्रयत्न त्यांनी व त्यांच्या कार्यालयाने केल्याचा मुख्य आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. या आरोपाची चौकशी करण्यासाठी मंजुरीची आवश्यकता होती. तो कायदेशीर अडथळा पार करण्यात आला आहे.

गुरुवारी सभापती नॅन्सी पेलोसी यांनी हा प्रस्ताव मांडला. आम्हाला असा प्रस्ताव मांडण्यात आनंद किंवा समाधान होत नाही पण अमेरिकेच्या राज्यघटनेचे संरक्षण व लोकशाहीच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा लागतोय असे त्या म्हणाल्या. या प्रक्रियेस सर्व सिनेट सदस्यांनी पाठिंबा द्यावा असेही आवाहन त्यांनी केले.

दरम्यान या प्रस्तावाच्या विरोधात विरोधी पक्ष डेमोक्रेट्सच्या दोन सदस्यांनी हरकत घेतली. त्यांनी या प्रस्तावाच्या विरोधात मत टाकले.

आता असा प्रस्ताव संमत झाल्यानंतर ट्रम्प यांची गुप्तहेर व न्यायिक समितीपुढे सुनावणी होईल. साक्षीदारांच्या साक्ष घेतल्या जातील.

ट्रम्प यांनी २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीतील त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी  नेते व डेमोक्रेट्स पक्षाचे सदस्य ज्यो बिडेन व त्यांचा मुलगा हंटर यांची एका प्रकरणात चौकशी करावी असा दबाव युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्सकी यांच्यावर आणला होता. त्या बदल्यात ट्रम्प यांनी झेलेन्सकी यांना सुरक्षा मदत म्हणून ४०० दशलक्ष डॉलर रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते, असा डेमोक्रेटिक पक्षाचा आरोप आहे.

व्हाइट हाउसची प्रस्तावावर नाराजी

ट्रम्प यांच्यावर महाभियोग चौकशीच्या प्रस्तावास हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने दिलेल्या मंजुरीवर व्हाइट हाउसने नाराजी व्यक्त करत हा निर्णय असंवैधानिक असल्याचा आरोप केला. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी  विरोधकांचा हा राजकीय सूड असल्याचा आरोप केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0