नवी दिल्लीः केंद्र सरकारची नवी आयटी नियमावली व ट्विटर यांच्यात सुरू असलेल्या वादात शुक्रवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे
नवी दिल्लीः केंद्र सरकारची नवी आयटी नियमावली व ट्विटर यांच्यात सुरू असलेल्या वादात शुक्रवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर खाते यूएस डीजिटल मिल्येनियम कॉपीराइट कायद्याचा भंग केल्या प्रकरणी ट्विटरने एक तासासाठी बंद ठेवले. ट्विटरच्या या कारवाईचा निषेध रवीशंकर प्रसाद यांनी केला असून ही कारवाई मनमानी व आयटी नियमांचा थेट उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी ट्विटरवर केला. त्यानंतर एका तासाने प्रसाद यांचे अकाउंट चालू करण्यात आले.
आपले अकाउंट चालू झाल्यानंतर प्रसाद म्हणाले, मित्रांनो, आज एक वेगळी घटना घडली. ट्विटरने माझे अकाउंट एक तासाभरासाठी बंद केले. या कारवाईमागचे कारण अमेरिकेच्या डिजिटल मिल्येनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन सांगितले गेले आणि नंतर अकाउंट सुरू करण्यात आले. ट्विटरची ही कारवाई म्हणजे ते स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक नसून त्यांना केवळ आपला अजेंडा कायम ठेवायचा आहे. अशा कारवाईतून त्यांना अशीही धमकी द्यायची आहे की, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी सहमत नसता तेव्हा ते तुमचे अकाउंट मनमानी पद्धतीने बंद करू शकतात.
रवीशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी पुढे अनेक ट्विट करत कोणत्याही सोशल मीडियाला देशातील नवे नियम पाळावे लागतील असे स्पष्ट केले.
मूळ बातमी
COMMENTS