ट्विटरवर फोटो, व्हिडिओ शेअरसाठी परवानगीची गरज

ट्विटरवर फोटो, व्हिडिओ शेअरसाठी परवानगीची गरज

नवी दिल्लीः सोशल मीडिया कंपनी ट्विटरने आपल्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. या नव्या बदलात कोणत्याही व्यक्तीचे खासगी फोटो व व्हीडिओ शेअर करताना संबं

नियमांची कडक अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री
सीरमच्या १० लाख लसी आफ्रिकेने परत पाठवल्या
गंगेच्या पातळीत वाढ; तरंगताना आढळले मृतदेह

नवी दिल्लीः सोशल मीडिया कंपनी ट्विटरने आपल्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. या नव्या बदलात कोणत्याही व्यक्तीचे खासगी फोटो व व्हीडिओ शेअर करताना संबंधिताची परवानगी अत्यावश्यक आहे, असे बंधन ट्विटरने घातले आहे.

एखाद्या ट्विटर ग्राहकाने त्याच्या खासगी आयुष्यात अन्य ट्विटर ग्राहकाने घुसखोरी केल्याची तक्रार केल्यास ट्विटर त्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करू शकते.

दोन दिवसांपूर्वी ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल आल्यानंतर त्यांनी ट्विटरच्या धोरणात पहिला मोठा बदल केला आहे. गोपनीयता व सुरक्षितता लक्षात घेऊन खासगी माहितीचे धोरण आम्ही बदलत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

सध्या ट्विटर त्यांच्या कोणत्याही ग्राहकाची व्यक्तिगत माहिती, फोन क्रमांक, पत्ता व इमेल आयडी संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय जाहीर करत नाही. ट्विटरच्या माहितीवरून एखाद्याला धमकी देण्याचे प्रकार होऊ शकतात. त्याच बरोबर एखाद्या व्यक्तीचे फोटो वा व्हीडिओ अन्य व्यक्तीने वापरल्यास त्याच्या खासगी आयुष्याचे उल्लंघन होऊ शकते, त्याच्या खासगी आयुष्यावर आक्रमण होऊ शकते. अशा आक्रमणामुळे एखाद्याला मानसिक वा शारीरिक इजा पोहचण्याची भीती आहे. विशेषतः महिला, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती व अन्य सामाजिक घटकांवर त्याचा परिणाम पडू शकतो, असे ट्विटरचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0