ओबामा, बिल गेट्स, जो बिडेन यांची ट्विटर अकाउंट हॅक

ओबामा, बिल गेट्स, जो बिडेन यांची ट्विटर अकाउंट हॅक

सॅन फ्रान्सिस्कोः अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बिडेन, रिअलिटी स्टार किम कर्दाशिन, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा

ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचे निधन
महाविकास आघाडीचा दावा सादर
बाबरी मशीद निकाल ९ महिन्यात हवा : सर्वोच्च न्यायालय

सॅन फ्रान्सिस्कोः अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बिडेन, रिअलिटी स्टार किम कर्दाशिन, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा व अब्जाधीश उद्योगपती इलन मस्क या सर्वांची ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे ट्विटरने गुरुवारी सांगितले.

हॅकरनी ट्विटर कंपनीच्या अंतर्गत प्रणालीत घुसखोरी केली असून त्यांनी या जगातील अनेक प्रभावशील व्यक्तींची ट्विटर अकाउंट हॅक केल्याचे ट्विटरच्या व्यवस्थापनाने सांगितले.

वर उल्लेख केलेल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त रॅपर केन वेस्ट, अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, गुंतवणूकदार वॉरेन बफेट, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, उबर, अपलचे कॉर्पोरेट अकाउंटही हॅकरनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या हॅकरनी अन्य ३०० अकाउंटमधून सुमारे १ लाख डॉलरची क्रिप्टोकरन्सी लंपास केल्याचे समजते.

या हॅकरनी केलेल्या सर्व कारवायांवर आपले लक्ष असून त्यांनी कोणती माहिती चोरली आहे व त्यांनी ट्विटरच्या अंतर्गत प्रणालीत कशी घुसखोरी केली याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे ट्विटरने सांगितले. ट्विटरला या प्रभावशाली व्यक्तींचे अकाउंट हॅक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही काळ या अकाउंटवरील माहितीची देवाणघेवाण बंद करण्यात आली होती.

गुरुवारी शेअर बाजार उघडल्यानंतर ट्विटरचे समभाग ५ टक्क्याने घसरले. तर अनेक तंत्रज्ञान विश्लेषकांनी ट्विटरच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

मूळ बातमी 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0