ट्विटरला वेगळा न्याय आणि भाजपावर कृपादृष्टी

ट्विटरला वेगळा न्याय आणि भाजपावर कृपादृष्टी

नवी दिल्लीः भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी ट्विटरवर उ. प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ट्विटरने हे नकाशे हटवले असले तरी पोलिसांनी मात्र

‘काशी विश्वनाथ-ज्ञानवापी प्रकरणी पुरातत्व सर्वेक्षण करावे’
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायज़ेशन एमसी १२ बैठकीच्या निमित्ताने..
२००२ ची गुजरात दंगलः संजीव भट्ट यांना अटक

नवी दिल्लीः भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी ट्विटरवर उ. प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ट्विटरने हे नकाशे हटवले असले तरी पोलिसांनी मात्र कारवाई सुरू केली आहे. ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक मनिष महेश्वरी व अन्य एक कर्मचारी अम्रिता त्रिपाठी या दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारताचा चुकीचा नकाशा, त्यातल्या त्यात जम्मू व काश्मीरचा भाग चुकीचा दर्शवण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी अनेकदा अशा चुका अनेकांकडून घडल्या आहेत. वास्तविक चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर ती घटना संबंधितांना नजरेस आणून दिल्यानंतर तो नकाशा हटवल्यानंतर पोलिस कारवाई सहसा केली जात नाही. त्यातही चुकीचा नकाशा न हटवल्यास अत्यंत तुरळक केसेस दाखल केल्या जात असतं. पण ट्विटरच्या बाबतीत केंद्र सरकारची संघर्षाची भूमिका दिवसेंदिवस कडवी होत चालली आहे.

२०१६मध्ये नरेंद्र मोदी सरकारने चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्याची घटना आढळल्यानंतर संबंधितांना ७ वर्षाचा कारावास व १०० कोटी रु.चा दंड अशा तरतुदी असलेला कायद्याचा प्रस्ताव तयार केला होता. पण या कायद्यात अनेक वादग्रस्त तरतुदी असल्याने तो कायदा अजूनही धुळ खात पडला आहे.

पण हा कायदा येण्या आधी व आताही अशा अनेक घटना घडल्या आहेत की, ज्या मध्ये भारताचा नकाशा ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमात चुकीच्या पद्धतीने दर्शवला आहे, ती चूक संबंधितांनी मान्य केली आहे. अनेकदा अशाही घटना घडल्या आहेत की सत्ताधारी पक्ष भाजपाकडूनही चुकीचे नकाशे प्रसिद्ध केले गेले आहेत. पण त्यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

या घटना कोणकोणत्या घडल्या ते खालील प्रमाणे

 • कर्नाटकातल्या भाजपच्या खासदार शोभा करंदलाजे यांनी २०२०मध्ये चिकमंगळुरू येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा देण्याच्या एका जाहीर कार्यक्रमात भारताचा चुकीचा नकाशा असलेला एक मोठा फलक व्यासपीठावर प्रसिद्ध केला होता. या नकाशात जम्मू आणि काश्मीरचा उत्तर व पश्चिमेचा भाग गायब होता. या कार्यक्रमाचे ट्विट करंदलाजे यांनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर एकाने करंदलाजे यांची चूक निदर्शनास आणून दिली. पण पोलिसांनी या संदर्भात करंदलाजे यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. हा कार्यक्रम राष्ट्र जागरण समितीने आयोजित केला होता.

करंदलाजे यांचे भारताचा चुकीचा नकाशा असलेले ट्विट अजूनही ट्विटरवर आहे. यावर कर्नाटक पोलिसांनी कारवाई केलेली नाही. ट्विटरवर केस दाखल करणार्या उ. प्रदेश पोलिसांनाही हे ट्विट अद्याप दिसलेले नाही.

 • गुजरात सरकार, सप्टेंबर २०१४

गुजरात सरकारने चीनच्या गुआंगडोंग या प्रांताच्या नकाशाच्या काही प्रती वाटला होत्या. या प्रतींमध्ये भारताच्या अरुणाचल प्रदेशाचा भाग चीनचा म्हणून दाखवण्यात आला होता. या चुकीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली होती. भारताच्या सार्वभौमत्वाला, प्रजासत्ताक व्यवस्थेला व परराष्ट्र धोरणाचा हा थेट अपमान असल्याचे काँग्रेसचे म्हणणे होते. पण या प्रकारावर पुढे काहीही पोलिस कारवाई झाली नाही.

 • शशी थरुर, डिसेंबर २०१९

भाजप खासदार शोभा करंदलाजे यांच्या चुकीनंतर सहा महिन्यानंतर भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्याची घटना काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडून झाली होती. त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात एक ट्विट शेअऱ केले होते. त्यामध्ये भारताचा नकाशा चुकीचा होता. यावर टीका झाल्यानंतर थरूर यांनी हे ट्विट काढून टाकले. थरूर यांच्या या चुकीवर भाजपच्या अमित मालवीय, संबित पात्रा या नेत्यांनी सडकून टीका केली. पण पोलिसांनी या संदर्भात अद्याप केस दाखल केलेली नाही.

 • नमस्ते लंडनचे निर्माते, ऑगस्ट २०१८

नमस्ते लंडन या चित्रपटाचे एक पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये अक्साइ चीनचा भाग भारताच्या नकाशातून वगळण्यात आला होता. ही चूक लक्षात आल्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आले. या संदर्भात कोणावरही कारवाई झाली नाही.

 • आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायझर, मार्च २०१५

मार्च २०१५मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला होता. यात पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा भाग पाकिस्तानात दाखवण्यात आला होता. ऑर्गनायझरच्या इंटरनेट एडिशनने ही चूक लक्षात आल्यानंतर दिलगिरी दर्शवत हा नकाशा हटवला होता. पण छापील मासिकात चुकीचा नकाशा प्रसिद्ध झाला होता. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा संसदेत उठवला होता. पण पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

 • ऑस्ट्रेलिया, नोव्हेंबर २०१४

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे नियोजित जी-२०च्या बैठकीत भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला होता. भारताच्या परराष्ट्र खात्याने ही चूक आयोजकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने माफी मागितली.

 • बीबीसी, जानेवारी २०२१

या वर्षी जानेवारीमध्ये बीबीसीने भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केला होता. एक दिवसानंतर बीबीसीने माफी मागितली व पुढील बातमीमध्ये त्यांनी आपली चूक सुधारली. बीबीसीवर कारवाई झाली नाही.

 • अल जझिरा, एप्रिल २०१५

अल जझिरा या वृत्तवाहिनीनेही भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केला होता. त्यांनी आपली चूक पाच दिवसांनंतर सुधारली. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान खात्याने अल –जझिराला दंड केला. पण त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई झाली नाही.

 • जागतिक आरोग्य संघटना, फेब्रुवारी २०२१

जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर भारताच्या नकाशात जम्मू व काश्मीरचा प्रदेश न दाखवल्याबद्दल भारत सरकारने तक्रार दाखल केली होती. त्यावर या संघटनेने आपण अशा नकाशाबाबत आपली मते व्यक्त करत नाहीत, असे स्पष्टीकरण दिले होते.

 • मार्क झकरबर्ग, मे २०१५

फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी मे २०१५मध्ये जगाचा नकाशा प्रसिद्ध केला होता. या नकाशात भारताच्या सीमा चुकीच्या पद्धतीने दर्शवल्या गेल्या होत्या. अनेकांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर झकरबर्ग यांनी आपली पोस्ट हटवली.

 • विकीपीडिया, डिसेंबर २०२०

भारताचा प्रदेश असलेला अक्साई चीन हा चीनचा भाग असल्याचा नकाशा विकीपीडियात प्रसिद्ध झाल्यानंतर भारत सरकारने ती चूक त्यांच्या लक्षात आणून दिली होती. हा चुकीचा नकाशा हटवण्यात यावा असे पत्र केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांनी कंपनीला धाडले होते. पण यावर कोणतीही पोलिस केस झाली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0