आरे कारशेडच्या कामाला स्थगिती

आरे कारशेडच्या कामाला स्थगिती

पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

सरदार पटेल स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव
नितीश कुमार यांचा एनआरसीवरून संभ्रम
अमित शहा कुठे होते? ताहिर हुसैन, अंकित शर्माचे सत्य काय?

आरे येथे मेट्रोच्या कारशेडसाठी रात्री झाडे कापण्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यामध्ये संताप उसळला होता. सत्तेवर आल्यानंतर हे काम थांबविण्यात येईल, असे आश्वासन शिवसेनेने दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात येऊन पदभार स्वीकारल्यानंतर लगेच कारशेडचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला.

ठाकरे म्हणाले, “आरे कारशेडच्या कामाला मी आज स्थगिती दिलेली आहे. आरेत सुरू असलेली झाडांची कत्तल मला चालणार नाही. कोणत्याच विकासाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही. पण जर का आपल्या हातातलं वैभव गमावून काही कमावत असू तर तो विकास होऊ शकत नाही. जोपर्यंत याचा पुनर्विचार करून पुढची दिशा ठरत नाही तोपर्यंत आरेमधलं एक झाड काय एक पानसुद्धा तोडता येणार नाही.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकी वेळी जे विषय गरम झाला होता, त्या आरे कारशेडच्या कामाला मी आज स्थगिती दिलेली आहे आणि त्याचा पूर्णपणे रिह्यू घेतल्याशिवाय हे काम होणार नाही. आजसुद्धा बातमी आली की, रात्री झाडे तोडली. ही कत्तल मला चालणार नाही. मी या कामाचं पूनर्परीक्षण करीन आणि जे काही गरजेचं असेल ते करेन. विकास हा होणार, मी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिलेली नाही.”

निर्णयावर फडणवीस यांची टीका

आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या निर्णयाबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.

जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतकणूवदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील, असे त्यांनी ट्वीट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0