‘बाबरी मशीद पाडली नसती तर सत्य बाहेर आले नसते’

‘बाबरी मशीद पाडली नसती तर सत्य बाहेर आले नसते’

भोपाळ : अयोध्येतील बाबरी मशीद पाडली नसती तर सत्य बाहेर आले नसते असे विधान भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी गुरुवारी केले. बुधवारी राममंदिरासाठी

‘बाबरीचा निकाल बिलकुल योग्य नाही’
बाबरी पाडण्यासाठी करसेवा केल्याचा फडणवीसांचा दावा
रामजन्मभूमी : विचित्र तर्क असलेला निकाल

भोपाळ : अयोध्येतील बाबरी मशीद पाडली नसती तर सत्य बाहेर आले नसते असे विधान भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी गुरुवारी केले. बुधवारी राममंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली होती. या निर्णयाचे स्वागत करताना एनडीटीव्हीशी बोलताना उमा भारती यांनी बाबरी मशीद पाडली नसती तर पुरातत्व संशोधकांना महत्त्वाच्या पुराव्यांचा पत्ता लागला नसता असे स्पष्ट करत राममंदिर उभे करण्याचे श्रेय सर्वोच्च न्यायालयाकडे जात असले तरी १९९२मध्ये अयोध्येत ज्यांनी आपले प्राण गमावले व त्यानंतर ज्या साक्षी न्यायालयापुढे आल्या त्यांच्यामुळे हा निर्णय झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

२०१९ची लोकसभा निवडणूक लढवली नसली तरी आपण राजकारणात सक्रीय असून २०२४च्या निवडणुकांत आपण लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरात सीएएविरोधातील आंदोलनावर भाष्य करताना उमा भारती यांनी विरोध करणाऱ्यांनी हा कायदा तरी वाचावा असे आवाहन केले. राहुल गांधी व प्रियंका गांधी हे टीआरपीसाठी बोलत असतात असे त्या एका प्रश्नाला उत्तर देताना दोघांचे नाव न घेता म्हणाल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0