पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या

मुंबईः राज्यात महाविकास आघाडी सरकारवर आलेले राजकीय संकट व पावसाने लावलेला विलंब या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाल

मान्सून केरळमध्ये, राज्यात आठवडाभरात पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता
येत्या २ दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

मुंबईः राज्यात महाविकास आघाडी सरकारवर आलेले राजकीय संकट व पावसाने लावलेला विलंब या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबत गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्यांची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

गेल्या वर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी २७० मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ १३४ मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ १३ टक्के (२०.३० लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार

कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे २९ जून रोजी नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठा नियोजनाबाबतचा आढावा घेणार आहेत.

राज्यात ४९६ टँकर्सने पाणीपुरवठा

राज्यात २७ जूनअखेर ६१० गावे आणि १२६६ वाड्यांना ४९६ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या ६६ तर खाजगी टँकर्सची संख्या ४३० इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत ३१ ने तर टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत २४ ने आणि वाड्या वस्त्यांच्या संख्येत १३० ने घट झाली आहे. 

राज्यातील पाणीसाठा

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा २८ जूनअखेर २१.८२ टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात ३३.८० टक्के, मराठवाडा विभागात २७.१० टक्के, कोकण विभागात ३४.४३ टक्के, नागपूर विभागात २६.८१ टक्के, नाशिक विभागात २०.०२ टक्के, पुणे विभागात १२.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0