धार्मिक सलोखा म्हणून मंदिरात नमाजः २ मुस्लिमांवर गुन्हा

धार्मिक सलोखा म्हणून मंदिरात नमाजः २ मुस्लिमांवर गुन्हा

लखनौः धार्मिक सलोखा व सौहार्द समाजात पसरावे या हेतूने मथुरा येथील नंदबाबा मंदिरात विना परवानगी नमाज पठण केल्याने उ. प्रदेश पोलिसांनी दिल्लीतील एक सामा

कोविड १९ लस आणि डब्ल्यूटीओ
४२ टक्के स्थलांतरीत मजुरांच्या घरात अन्नधान्याची वानवा
डॉ. कफील खान यांच्या चौकशीचे पुन्हा आदेश

लखनौः धार्मिक सलोखा व सौहार्द समाजात पसरावे या हेतूने मथुरा येथील नंदबाबा मंदिरात विना परवानगी नमाज पठण केल्याने उ. प्रदेश पोलिसांनी दिल्लीतील एक सामाजिक संघटना खुदाई खिदमतगार या संस्थेच्या ४ सदस्यांविरोधात रविवारी गुन्हा दाखल केला. या चौघांची नावे फैजल खान, चांद मोहम्मद, आलोक रतन, नीलेश गुप्ता अशी असून या चौघांनी नमाज पठणाचे फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध केले होते. या चौघांनी आपले कृत्य धार्मिक सलोखासाठी असा दावा केला असला तरी पोलिसांनी त्यांच्यावर विविध धर्मांमध्ये तेढ व दुष्मनी वाढवल्याचा आरोप ठेवला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी खुदाई खिदमतगारचे अध्यक्ष फैजल खान यांना अटक केली आहे.

ही घटना कळल्यानंतर सोमवारी मंदिर प्रशासनाने मंदिराची गंगाजल व हवन करून शुद्धता केली.

ही घटना २९ ऑक्टोबरची होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या चौघांपैकी दोन मुस्लिमांनी मंदिरात जाण्याची परवानगी मागितली होती. त्या दोघांना तशी परवानगी देण्यात आली. मंदिरात कोणताही धार्मिक भेदभाव पाळला जात नसल्याने त्यांना परवानगी देण्यात आली. पण नंतर या दोघांनी मंदिरात  नमाज पठण केले व त्याचे फोटो संध्याकाळी सोशल मीडियात प्रसिद्ध झाले. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली, असे पोलिसांनी सांगितले.

खुदाई खिदमतगारचे प्रवक्ते पवन यादव यांनी मंदिर प्रशासनाने दोघा मुस्लिमांना नमाज पठणाची परवानगी दिली होती, असे सांगितले. पण मंदिर प्रशासनाने आम्ही अशी परवानगी दिली नव्हती असे स्पष्ट केले.

या मंदिराचे विश्वस्त असलेल्या मुकेश गोस्वामी यांनी सांगितले की, फैजल खान याने हिंदू धर्म स्वीकारला असून तो काही श्लोकही म्हणत असतो. त्याने श्लोक म्हटल्यानंतर त्याला मंदिरात प्रवेश व प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात आली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0