कोरोनाः मजुरांच्या जप्त सायकली विकून २३ लाख कमावले

कोरोनाः मजुरांच्या जप्त सायकली विकून २३ लाख कमावले

सहारनपूरः मार्च २०२० मध्ये कोरोना महासाथीचे वाढता प्रकोप म्हणून मोदी सरकारने देशव्यापी लॉकडाऊन पुकारला होता. अचानक पुकारलेल्या या लॉकडाऊनमुळे लाखो मजू

कुर्ल्याच्या नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
असंघटित क्षेत्राला १.५ लाख कोटी रु.चे आर्थिक पॅकेज?
१५ एप्रिलनंतर सेवा देण्यास रेल्वे तयार

सहारनपूरः मार्च २०२० मध्ये कोरोना महासाथीचे वाढता प्रकोप म्हणून मोदी सरकारने देशव्यापी लॉकडाऊन पुकारला होता. अचानक पुकारलेल्या या लॉकडाऊनमुळे लाखो मजूर, कष्टकरी, श्रमिक शहरांमध्ये अडकले व ते आपल्या घरात पोहचू शकले नाही. या लॉकडाऊनमध्ये ज्या श्रमिकांनी आपल्या सायकलींवरून घरी जाण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या सायकली पोलिसांनी जप्त केल्या.

उत्तर प्रदेशात लॉकडाऊनच्या काळात पोलिसांची दहशत अनेकांनी पाहिली होती. या राज्याच्या पोलिसांनी लॉकडाऊन काळात मजुरांच्या जप्त केलेल्या हजारो सायकलींचा लिलाव करून २१ लाख रु. कमावले आहेत.

उ. प्रदेशातील सहारनपूर जिल्हा पोलिसांनी ५४०० सायकली जप्त केल्या होत्या. या सायकली सोडवण्याइतपत पैसेही या श्रमिकांकडे नव्हते. त्यामुळे या सायकली गेले अनेक महिने सहारनपूरमधील एका ओसाड मैदानावर पडून गेल्या होत्या. ज्यांच्या सायकली होत्या त्यांना श्रमिकांना पोलिसांनी एक टोकन दिले होते पण पैसेच नसल्याने सायकली घेण्यास कोणीच पुढे आले नाहीत.

अखेर दोन वर्षांनंतर सहारनपूर प्रशासनाने ५००० हून अधिक सायकलींचा लिलाव करून २१ लाख रु. कमावले. या सायकली एक कंत्राटदार जितेंद्र याने विकत घेतल्या असून त्याने प्रत्येक सायकली विकण्याचे ठरवले आहे. त्याने प्रत्येक सायकलीची किंमत १२०० रु. इतकी निश्चित केली आहे. त्याला आता खरेदीदारही मिळणे मुश्किल झाले आहे. जितेंद्रने आपल्याला केवळ ४००० सायकली मिळाल्या असल्याचा आरोप केला आहे.

छायाचित्र – प्रतिनिधीक स्वरूपाचे

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0