ट्विटरवर अरब जगतातून ‘बॉयकॉट इंडिया’चा ट्रेंड

ट्विटरवर अरब जगतातून ‘बॉयकॉट इंडिया’चा ट्रेंड

नवी दिल्लीः भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याप्रकरणाच

फडणवीसांचे समाधान, राष्ट्रवादीचा कार्यक्रम
उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय आत्मघातकी
भाजपसाठी स्त्रियांचे हक्क पुरूषधार्जिणेच!

नवी दिल्लीः भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याप्रकरणाचे पडसाद अरब जगतातून ट्विटरवर दिसून आले. अरब जगतातून भारतीय उत्पादनांवर बंदी घालावी अशी मागणी ट्विटरच्या माध्यमातून दिसून आली. ओमानचे मुख्य मुफ्ती शेख अल खलिली यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून बॉयकॉट इंडियन प्रॉडक्ट असा ट्रेंड सुरू झाला. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.

या ट्विटर ट्रेंडनंतर भाजपने आपली लगेच प्रतिक्रिया व्यक्त करत भाजप पक्ष कोणत्याही धर्माचा, पंथांचा अवमान करण्याच्या विरोधात असून आमचा पक्ष सर्व धर्माचा आदर करतो व कोणा धर्माचा वा त्या धर्माच्या प्रेषिताचा अवमान करण्याची आम्ही निंदा करतो असे ट्विट केले. भाजप अन्य धर्माचा अवमान करण्यांविरोधात वा त्यांच्या विचारसरणीशी संबंध ठेवत नसल्याचे भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी ट्विट केले आहे. भारतामध्ये हजारो वर्ष अनेक धर्माचे लोक राहात आहे, या भूमीत अनेक धर्मांचा प्रसार झाला व ते फुलले. आमचा पक्ष कोणत्याही धर्माचा अवमान करण्याविरोधात असल्याचे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे.

नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई

नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर देशातून अनेक भागातून फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर रविवारी भाजपने नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. त्याचबरोबर भाजपचे मीडिया प्रभारी नवीन जिंदाल यांचेही प्राथमिक सदस्यत्व भाजपने रद्द केले आहे. या दोघांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित झाले आहे.

नुपूर शर्मा यांच्याविरोधात महाराष्ट्रात मुंबई व पुण्यातून गुन्हे दाखल झाले आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0