देशद्रोह व दहशतवादाचे गुन्हेः पत्रकार कप्पनवर आरोपपत्र

देशद्रोह व दहशतवादाचे गुन्हेः पत्रकार कप्पनवर आरोपपत्र

उ. प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने मल्याळी पत्रकार सिद्दिक कप्पन यांच्यासहित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाज स्टुडंटचे विंग लीडर के. ए. रौफ शेरीफ व अन्य ६ जणांच्या विरोधात देशद्रोह, गुन्हेगारी कटकारस्थान, दहशतवाद्यांनी आर्थिक मदतीसाठी मदत उभी करणे व अन्य गुन्हे असलेले ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

वादग्रस्त निर्णय देणाऱ्या न्यायाधीशाची बढती रोखली
ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉरची तलवार
कोरोना आणि औषधशास्त्र

उ. प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने मल्याळी पत्रकार सिद्दिक कप्पन यांच्यासहित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाज स्टुडंटचे विंग लीडर के. ए. रौफ शेरीफ व अन्य ६ जणांच्या विरोधात देशद्रोह, गुन्हेगारी कटकारस्थान, दहशतवाद्यांनी आर्थिक मदतीसाठी मदत उभी करणे व अन्य गुन्हे असलेले ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

न्यू इंडिया एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात कप्पन व शेरीफ यांच्याव्यतिरिक्त अतिकर रेहमान, मोहम्मद दानिश, अलम, मसूह अहमद, फिरोज खान व असाद बद्रूद्दीन यांचीही आरोपपत्रात नावे आहेत. या सर्वांनी उ. प्रदेशात अशांतता व अस्थिरता माजावी या उद्देशाने दोहा व मस्कत येथून ८० लाख रु.ची मदत मिळवली होती, असा आरोप पोलिसांनी लावला आहे.

हे सर्व आरोपी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेशी संलग्न असलेल्या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे सदस्य आहेत. पण कप्पन यांच्या वकिलांनी आपल्या अशीलाचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी कोणताही संबंध नसल्याचा अनेकदा दावा केला आहे. खुद्ध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियानेही कप्पन आपल्या संघटनेचे सदस्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान या आरोपपत्राविरोधात सर्वजण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे वकील मधुबन दत्त यांनी ‘लाइव लॉ’ला सांगितले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?  

गेल्या वर्षी कप्पन यांच्या विरोध उ. प्रदेश पोलिसांनी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रात उ. प्रदेश सरकारने कप्पन हे पत्रकार असल्याचे खोटे सांगत हाथरस येथे जात होते आणि त्यांना दहशतवादी समजून ५ ऑक्टोबर रोजी अन्य तिघांसह अटक करण्यात आल्याचे म्हटले होते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी कप्पन यांचा संबंध असल्याने कप्पन यांना ताब्यात घेतले होते, असेही पोलिसांनी म्हटले होते.

पण उत्तर प्रदेश सरकारने प्रतिज्ञापत्रात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे नाव लिहिलेले नव्हते पण बंदी घातलेल्या संघटनेशी कप्पन यांचा संबंध होता असा दावा केला होता. प्रत्यक्षात या संघटनेवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही आणि कप्पन यांचे अशा कोणत्या संघटनेचे संबंध आहेत हे राज्य सरकार सिद्ध करू शकलेले नव्हते.

कप्पन यांच्यावर दाखल केलेल्या फिर्यादीत कप्पन यांच्या जवळ ‘Am I Not India’s Daughter’, असा मजकूर लिहिलेले भित्तीपत्रके होती व ही पत्रके चिथावणीखोर होती, असा पोलिसांचा दावा होता. प्रत्यक्षात ही पत्रके हाथरस बलात्कार प्रकरणाशी संबंधित होती व ती पीडितेला न्याय मागण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली होती. यात कोणताही कायदा मोडणारी भाषा नव्हती.

उ. प्रदेश पोलिसांनी कप्पन यांच्यावर justiceforhathrasvictim.carrd.co ही वेबसाइट तयार केल्याचाही आरोप ठेवला होता. वास्तविक ही वेबसाइट अमेरिकेतील ब्लॅक लाइव्ह मॅटर आंदोलनाशी संबंधित होती व नंतर ही साइट बंद करण्यात आली होती. पण ही साइट कोणी तयार केली वा बंद केली याचे कोणतेही पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. हे पुरावे न मिळूनही कप्पन यांनी हिंसेला प्रोत्साहन दिले व दहशतवादी कृत्यात सहभाग घेतला असे आरोप पोलिसांनी लावले होते.

कप्पन हे केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या संघटनेच्या दिल्ली युनिटचे सचिव आहेत.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात ईडीने परदेशातून पैसा मिळतो या कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाज स्टुंडटच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: