थरुर, सरदेसाईंसह अनेकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल

थरुर, सरदेसाईंसह अनेकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांच्या ट्रॅक्टर रॅली संदर्भातल्या बातम्यांची शहानिशा न करता त्या प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवत उ. प्रदेश पोलिसांनी अ

मनपरिवर्तनः भाजप खासदाराचा राजीनामा मागे
क्रौर्याचा अहवाल
समलैंगिक विवाहाला केंद्र सरकारचा विरोध कायम

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांच्या ट्रॅक्टर रॅली संदर्भातल्या बातम्यांची शहानिशा न करता त्या प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवत उ. प्रदेश पोलिसांनी अनेक पत्रकार, राजकीय नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर, इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई, नॅशनल हेराल्डच्या वरिष्ठ सल्लागार संपादक मृणाल पांडे, कौमी आझादचे संपादक झफर आगा, कारवाँचे संपादक व संस्थापक परेश नाथ, कारवाँचे संपादक अनंत नाथ व कार्यकारी संपादक विनोद जोस आणि अन्य एकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या फिर्यादीत उ. प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे की, संबंधित आरोपींनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत धडकलेल्या शेतकर्यांच्या ट्रॅक्टर रॅली संदर्भातल्या बातम्यांची शहानिशा केली नाही. पोलिसांवर मोठ्या प्रमाणात जमावाकडून हल्ला होत असताना या आरोपींनी खोट्या बातम्या अत्यंत सुनियोजित व पद्धतशीरपणे पसरवल्या व पोलिसांकडून एका आंदोलकावर गोळी झाडल्याचे खोटे वृत्त पसरवले. अशी वृत्ते पसरवून मोठ्या प्रमाणावर जातीय दंगल घडवण्याचा व समाजात हिंसाचार पसरवण्याचा या आरोपींचा प्रयत्न होता.

या फिर्यादीत लाल किल्ल्यावर तिरंगा व धार्मिक ध्वज फडकवण्याचाही उल्लेख असून या आरोपींनी भारतीय प्रजासत्ताकाविरोधात एक प्रकारे बंड पुकारण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्याकडून समाजात शत्रूत्व, हिंसा व दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

ही फिर्याद नॉयडास्थित अर्पित मिश्रा यांनी सेक्टर-२० पोलिस ठाण्यात सीआरपीसी सेक्शन १५४ अंतर्गत नोंदवली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0