लखनौः विना वॉरंट कोणाचीही तपासणी व त्याला ताब्यात घेण्यासाठी उ. प्रदेशमधील आदित्य नाथ सरकार एक नवे सुरक्षा दल तयार करण्याच्या तयारीत आहे. ही सुरक्षा य
लखनौः विना वॉरंट कोणाचीही तपासणी व त्याला ताब्यात घेण्यासाठी उ. प्रदेशमधील आदित्य नाथ सरकार एक नवे सुरक्षा दल तयार करण्याच्या तयारीत आहे. ही सुरक्षा यंत्रणा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)च्या धर्तीवर असून हे दल उ. प्रदेश राज्यातील न्यायालये, विमानतळे, प्रशासकीय लवाद प्राधिकरण, मेट्रो, बँका, तीर्थस्थळे, शैक्षणिक संस्था, वित्तीय संस्था, औद्योगिक संस्था व अन्य सरकारी कार्यालयात तैनात करण्यात येणार आहे. या दलातील सुरक्षा रक्षकांना जिल्हाधिकार्याच्या कोणत्याही आदेश वा वॉरंटशिवाय कोणाचीही तपासणी वा त्याला ताब्यात घेण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत.
रविवारी एक ट्विटद्वारे उ. प्रदेश सरकारने त्याची घोषणा केली. या दलाचे नाव उ. प्रदेश विशेष सुरक्षा दल असे निश्चित केले असून या नव्या यंत्रणेवर १,७४७ कोटी रु. खर्च केले जाणार आहेत. या खर्चात कर्मचार्यांचे वेतन व आस्थापनावरचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. या दलातील ९,९१९ सुरक्षा रक्षक कार्यरत असतील. या दलाच्या ५ बटालियन तयार केल्या जातील. प्रत्येक बटालियनमध्ये १,९१३ पदे असतील. या दलाचे मुख्य कार्यालय लखनौत असेल व त्याचे प्रमुख संचालक पद अतिरिक्त पोलिस महासंचालक स्तराच्या अधिकार्याकडे सोपवण्यात येईल.
मूळ बातमी
COMMENTS