यूपीएससी मुलाखतः ७ दिवस मोफत राहण्याची सुविधा

यूपीएससी मुलाखतः ७ दिवस मोफत राहण्याची सुविधा

मुंबई: कोरोना महासाथीच्या काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत व ज्यांची दिल्लीत राहण्याची सोय नाही किंवा ज्या उमेदवारांना हॉटेलात राहणे शक्य नाही किंवा ज्यांना दिल्लीत जाऊन मॉक इंटरव्ह्यू द्यायचे असतील आणि मुलाखतीनंतर वैद्यकीय तपासणी द्यायची आहे, अशा उमेदवारांना नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन व जुने महाराष्ट्र सदनामध्ये जास्तीत जास्त ७ दिवस निःशुल्क राहण्याची सोय राज्य सरकारने करून दिली आहे. ही निःशुल्क सुविधा प्रति व्यक्ती प्रति पलंग अशी आहे.

 

COMMENTS