इस्लामाबाद : जम्मू व काश्मीर राज्याला राज्यघटनेकडून मिळालेला ३७० कलमाचा विशेष दर्जा भारतीय संसदेने रद्द केल्यानंतर या प्रदेशातील परिस्थिती पाहण्यासाठी
इस्लामाबाद : जम्मू व काश्मीर राज्याला राज्यघटनेकडून मिळालेला ३७० कलमाचा विशेष दर्जा भारतीय संसदेने रद्द केल्यानंतर या प्रदेशातील परिस्थिती पाहण्यासाठी अमेरिकेच्या संसद सदस्यांनी भारतव्याप्त काश्मीरला भेट देण्याची विनंती भारत सरकारला केली होती. पण भारत सरकारने ही विनंती फेटाळल्यानंतर अमेरिकेच्या या शिष्टमंडळाने पाकव्याप्त काश्मीरला रविवारी भेट दिली. या शिष्टमंडळात सिनेटर क्रिस हालेन, मॅगी हसन, उपराजदूत पॉल जोन्स व अन्य सदस्य होते.
गेल्या शनिवारी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारत व पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तेथील वास्तव परिस्थिती समजून घेण्यासाठी अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनी दौरा करावा अशी विनंती केली होती. पण भारताने क्रिस हालेन यांना भारतव्याप्त काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी दिली नाही. हालेन यांनी परवानगी न मिळूनही गुरुवारी व शुक्रवारी भारतात येऊन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासहित अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
अमेरिकेच्या या शिष्टमंडळाने रविवारी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादला भेट देऊन तेथील जनजीवनाची माहिती घेतली. अमेरिकेच्या संसद सदस्यांच्या या भेटीमागे ३७० कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये नेमके काय बदल झाले ते माहिती करून घेण्याचा या शिष्टमंडळाचा प्रयत्न होता, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रखात्याने म्हटले आहे.
अमेरिकेच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली असून जम्मू व काश्मीरमधील संचारबंदी लवकरात लवकर मागे घ्यावी असे म्हटल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्रखात्याचे म्हणणे आहे. या शिष्टमंडळाने पाकव्याप्त काश्मीरमधील प्रमुख नेते सरदार मसूद खान व राजा फारूख हैदर यांची भेट घेतली.
जम्मू व काश्मीर प्रश्नासंदर्भात भारतावर अमेरिकेने दबाव आणावा व संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीत त्यावर चर्चा व्हावी असे प्रयत्न अमेरिकेने करावे अशी मागणी सरदार मसूद खान यांनी केली आहे.
मूळ बातमी
COMMENTS