उ. प्रदेशात गंगा किनारी शेकडो मृतदेहांचे दफन

उ. प्रदेशात गंगा किनारी शेकडो मृतदेहांचे दफन

नवी दिल्लीः बिहारमधील बक्सर जिल्ह्यात चौसा येथील गंगा नदीत कोविड-१९चे संशयास्पद ७१ मृतदेह सापडल्याच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात २ हजार

कोविड महासाथीत आजपर्यंत ६० लाख मृत्यूमुखी
नवीन व्हरायंटला तोंड देण्यासाठी लशीचे २ डोस अत्यावश्यक!
मुलांना मॉलप्रवेशासाठी ओळखपत्र सक्तीचे

नवी दिल्लीः बिहारमधील बक्सर जिल्ह्यात चौसा येथील गंगा नदीत कोविड-१९चे संशयास्पद ७१ मृतदेह सापडल्याच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात २ हजाराहून अधिक मृतदेह गंगा नदीच्या किनार्यावर पुरलेले आढळून आले आहेत.

गाजियाबाद, कानपूर, उन्नाव, गाजीपूर, कनोज, बलिया परिसरात हे मृतदेह आढळून आले आहेत.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार केवळ उन्नावमध्ये ९००हून अधिक मृतदेह नदीच्या किनार्यावर पुरलेले आढळून आले आहेत. तर कन्नौजमध्ये ३५०, कानपूरमध्ये ४००, गाजीपूरमध्ये २८० मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती आहे कारण मध्य व पूर्व उत्तर प्रदेशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात अनेक कुटुंबांकडे मृतांचे अंत्यसंस्कार करण्याइतपत पैसे नसल्याने त्यांनी मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात उन्नाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने २०० हून अधिक मृतदेह नदीच्या वाळूत पुरल्याचे दिसून आले. गाजीपूरच्या गहमर घाटावरही ५ मृतदेह आढळून आले. या मृतदेहांची ओळख सांगण्यास अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. येथील स्मशानातील कर्मचारी कमला देवी डोम यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात असे दृश्य पूर्वी कधी पाहिलेले नव्हते. मृतदेह आणण्यासाठी नावा वापरल्या जात असून या सर्व परिसरात कोरोनाने थैमान घातलेले आहे. गहमर घाटानजीक वळण असल्याने गंगा नदीतून वाहत आलेले मृतदेह येथील वाळूत अडकलेले दिसून येतात.

उन्नावमध्ये एका चितेचा दर पूर्वी ५०० रु. होता तो आता दीड हजार ते २ हजार रु. झाला असून पूर्ण अंत्यसंस्कारासाठी १० हजार रु.चा खर्च केला जात आहे, अशी माहिती स्मशान घाटावरील नाभिक प्रदीप कुमार यांनी दिली.

उन्नावच्या बस्कर स्मशान घाटावर लाकडांचा दर प्रती क्विंटल १००० रु. इतका झाला आहे. त्यापुढे डोम, तूप व अंत्यसंस्कार अशा विधीचे ४५०० रु. घेतले जात आहेत.

हिंदुस्तान टाइम्सनुसार उन्नाव, बलिया, गाजीपूर येथील गंगा नदीच्या किनारी शेकडो दफन केलेले मृतदेह दिसून आले. बलिया व गाजीपूर आणि बक्सर व पटना जिल्ह्यात १५० हून अधिक मृतदेह आढळल्यानंतर केंद्र सरकार व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ही घटना गांभीर्याने घेतलेली दिसत आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0