पीएम केअर फंड एनआरआय, विदेशी देणगीदारांसाठी खुला

पीएम केअर फंड एनआरआय, विदेशी देणगीदारांसाठी खुला

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘पीएम केअर्स फंड’मध्ये परदेशी देणगीदारही आपली मदत देऊ शकणार आहेत. अशी परवानगी सर

नाताळ साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना
केंद्राच्या खर्चात ६० टक्क्यांची कपात
म्युकरमायकोसिस उपचाराचे दर निश्चित

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘पीएम केअर्स फंड’मध्ये परदेशी देणगीदारही आपली मदत देऊ शकणार आहेत. अशी परवानगी सरकारने दिली आहे.

२८ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधात लढण्यासाठी एक चॅरिटेबल ट्रस्ट – पंतप्रधान नागरिक साहाय्य व आपातकालीन मदत निधी- (पीएम केअर) स्थापन केला होता. त्यानंतर या आठवड्यात पंतप्रधानांनी सर्व भारतीय राजदूतांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करून अनिवासी भारतीय व भारतीय मूळ असलेल्या नागरिकांकडून पीएम केअरसाठी आर्थिक मदत मागितली जावे असे आवाहन करावे अशा सूचना दिल्या.

वास्तविक आपत्ती आल्यास आजपर्यंत भारत सरकारने विदेशी मदतीचा स्वीकार न करण्याची भूमिका घेतली होती पण ही भूमिका बाजूला ठेवून सरकारने त्यांचीही मदत स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. पण भारत सरकार अन्य देशांकडून मदत स्वीकारणार की नाही, याबद्दल संभ्रम अजून कायम आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारतासहीत अन्य ६३ देशांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी २७४ दशलक्ष डॉलरची मदत मंजूर केली होती. पण ही मदत थेट भारत सरकारला नव्हे तर देशातील रोगनियंत्रण व प्रतिबंधक केंद्राला ती केली होती.

२००४मध्ये जेव्हा भारतावर त्सुनामीची आपत्ती आली होती तेव्हा देशाने विदेशी मदत नाकारली होती.

पण आता भारताने पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधीमध्ये अनिवासी भारतीय, पीआयओ व आंतरराष्ट्रीय संस्थाकडून मदत स्वीकारण्यास परवानगी दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0