हरिद्वार धर्मसंसदेत मुस्लिमांच्या शिरकाणाचे आवाहन

हरिद्वार धर्मसंसदेत मुस्लिमांच्या शिरकाणाचे आवाहन

नवी दिल्लीः उत्तराखंडमधील हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित झालेल्या धर्म संसदेत कट्टर हिंदुत्ववादी नेते व कट्टरवाद्यांनी मुस्लिमांच्

भाजपात उडी मारलेल्या १९ पैकी १३ आमदारांचा पराभव
भाजप नेत्याच्या कार्यक्रमात चिथावणीखोर घोषणा
आश्चर्य जनतेच्या कौलाचे नव्हे, न्यायालयीन कौलाचे वाटायला हवे !

नवी दिल्लीः उत्तराखंडमधील हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित झालेल्या धर्म संसदेत कट्टर हिंदुत्ववादी नेते व कट्टरवाद्यांनी मुस्लिमांच्या विरोधात थेट चिथावणीखोर भाषणे देत त्यांचे हत्याकांड, शिरकाण करण्याचे आवाहन केले.

या धर्मसंसदेत भाजपाचे नेते अश्विनी उपाध्याय, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या उदिता त्यागी, हिंदू रक्षा सेनेचे अध्यक्ष स्वामी प्रबोधानंद गिरी, निरंजनी आखाडा व हिंदू महासभेच्या महासचिव साध्वी अन्नपूर्णा ऊर्फ पूजा शकुन पांडेय, स्वामी आनंदस्वरुप आदी उपस्थित होते.

या धर्मसंसदेत सर्वच वक्त्यांनी मुस्लिमांविरोधी चिथावणीखोर भाषणे दिली. यातील बहुसंख्य जणांवर या पूर्वी मुस्लिमांविरोधी चिथावणीखोर, धार्मिक तेढ, वैमनस्य निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचे आरोप आहेत.

महत्त्वाची बाब अशी की, यातील एकाही वक्त्यावर पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही.

या धर्मसंसदेत स्वामी प्रबोधानंद गिरी म्हणाले की, ‘म्यानमारमधून हिंदूंना पळवून लावले, तेथे हिंदूंच्या हत्या झाल्या पण तेथील नेते, सरकार, पोलिस मौन बाळगून होते. आपल्यालाही हेच करायचे आहे. हाच आपला मार्ग शिल्लक राहिला आहे. हा देश आपला आहे. दिल्ली सीमेवर हिंदुंना मारण्यात आले, त्यांचे मृतदेह लटकवण्यात आले. आता थांबण्यात काही अर्थ नाही. मरण्यासाठी वा मारण्यासाठी आता आपण तयार राहिले पाहिजे. या देशातल्या पोलिस, नेते, लष्कर व प्रत्येक हिंदूने हातात शस्त्र घेतले पाहिजे व सफाई मोहीम चालू केली पाहिजे.’

प्रबोधानंद यांची कारकीर्द ही कट्टरवादी अशीच आहे. त्यांनी उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियात यापूर्वी प्रसिद्ध केले आहेत. प्रबोधानंद यांचे फोटो उत्तराखंडचे उच्चशिक्षण खात्याचे मंत्री व भाजपचे नेते धन सिंह रावत, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्रई तीरथ सिंह रावत यांच्यासोबतही आहेत. २०१७मध्ये प्रबोधानंद यांनी प्रत्येक हिंदुने ८ मुलांना जन्म दिला पाहिजे तरच आपला समाज जगेल असे वक्तव्य केले होते. नंतर २०१८मध्ये त्यांनी केवळ मुस्लिमच हिंदू महिलांवर बलात्कार करतात असे विधान केले होते. या वर्षी जूनमध्ये त्यांनी अन्य कट्टरवादी यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुस्लिम नरसंहाराची विधाने केली होती.

या धर्मसंसदेत साध्वी अन्नपूर्णा ऊर्फ पूजा शकुन पांडेय यांनी शस्त्र उचलावीत व नरसंहार करावा असे आवाहन केले. मुसलमानांचे सामूहिक हत्याकांड करावे असेही त्या म्हणाल्या. मुसलमानांची लोकसंख्या कमी करायची असेल तर त्यांचे खून पाडले पाहिजेत. त्यासाठी हातात शस्त्रे घ्या, तुरुंगात जाण्याची तयारी करा. आपल्यातील १०० जण २० लाख मुसलमानांना मारण्यास तयार होतील, आपण विजयी होऊ, तुरुंगात जाऊ असे त्या म्हणाल्या. याच पांडेय यांनी अलिगडमधील हिंदू महासभेच्या कार्यालयातील मोदींची चित्र हटवले होते.

या धर्मसंसदेत चिथावणीखोर भाषणात स्वामी आनंदस्वरुप यांनीही सहभाग घेतला होता. त्यांनी मुस्लिमांचे शिरकाण करण्याचे आवाहन करत या धर्म संसदेचा निर्णय हे ईश्वराचे वचन असून सरकारने हे ऐकले पाहिजे. जर तसे झाले नाही तर १८५७च्या विद्रोहापेक्षा एक मोठे युद्ध होईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0