उत्तराखंडातील मंत्र्याची शंकरावर जलाभिषेक करण्याची खात्याला सक्ती

उत्तराखंडातील मंत्र्याची शंकरावर जलाभिषेक करण्याची खात्याला सक्ती

नवी दिल्लीः २६ जुलै रोजी आपल्या घराजवळ असलेल्या शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक करण्याचे आदेश उत्तराखंड राज्याच्या महिला सबलीकरण व बालविकास मंत्री रेखा

बिहार: आरसीपी सिंह यांनी जनता दल सोडले
पुष्पवृष्टीने उभे केलेले काटेरी प्रश्न!
आर्थिक विकासदर १२ टक्क्याने वाढेलःआयएमएफ

नवी दिल्लीः २६ जुलै रोजी आपल्या घराजवळ असलेल्या शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक करण्याचे आदेश उत्तराखंड राज्याच्या महिला सबलीकरण व बालविकास मंत्री रेखा आर्य यांनी आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना दिले आहेत. शंकरावर जलाभिषेक केल्याचे फोटो व्हॉट्स अप व मेलवर पाठवावेत असेही आदेश मंत्रिमहोदयांनी दिले आहेत. आर्य यांचे आदेश त्यांच्या खात्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ते, सहाय्यक यांना लागू होतील. त्यांचे आदेश हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचा एक भाग असून २०१५ साली केंद्र सरकारने बेटी बचाओ, बेटी पढाओ हा देशव्यापी कार्यक्रम हाती घेतला होता, त्या कार्यक्रमाचा शंकरावरील जलाभिषेक एक भाग असल्याचे आर्य यांचे म्हणणे आहे. शंकर जलाभिषेक कार्यक्रमांतर्गत कांवड यात्रेची घोषणा केली जाणार आहे, यात ‘मुझे भी जन्म लेने दो, शिव के माह में शक्ति का संकल्प है’, असा संदेश दिला जाणार असल्याचे आर्य यांचे म्हणणे आहे. कांवड यात्रेत महिला सबलीकरण व बालविकास खात्यातल्या सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामील होणे अनिवार्य आहे.

दरम्यान रेखा आर्य यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना धार्मिक कार्यक्रमात सामील होण्याच्या सक्तीच्या आदेशाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाल्या आहेत. घटनेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना कोणताही धर्म कामकाजात पाळता येत नाही किंवा एखाद्या विशिष्ट धर्माचाच प्रचार, प्रसार करता येत नाही, अशी बंधने आहेत. पण आर्य यांचे असे आदेश सरकारी नियमांची पायमल्ली असल्याच्याही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संघटना ऑल इंडिया फेडरेशन फॉर अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स या संघटनेने आर्य यांचा आदेश भारतीय घटना व धर्मनिरपेक्षतेचे थेट उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे. संघटनेने या कार्यक्रमावर आपण बहिष्कार घालत असल्याचीही घोषणा केली आहे. अंगणवाडी महिलांना फेब्रुवारी महिन्यापासून पगार व पूरक आहारासाठी लागणारा निधी सरकारने दिलेला नाही पण सरकार आपला कार्यक्रम बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत पुढे रेटत आहेत, हे आश्चर्यकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

दरम्यान, द वायरला दिलेल्या प्रतिक्रियेत उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष करन महारा म्हणाले की, सरकारी कामात धर्माचा समावेश करणे हा चुकीचा पायंडा असून उत्तराखंड सारख्या राज्यात आजपर्यंत असा आदेश कुणा मंत्र्याने दिलेला नव्हता. भगवान शंकर हे सनातन धर्माचे प्रतीक आहे, त्यांची पूजा परंपरेनुसार केली पाहिजे पण या पूजा करण्याचे अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांना करण्याचे आदेश देणे व तसे फोटो सोशल मीडियात शेअर करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0