‘काशी विश्वनाथ-ज्ञानवापी प्रकरणी पुरातत्व सर्वेक्षण करावे’

‘काशी विश्वनाथ-ज्ञानवापी प्रकरणी पुरातत्व सर्वेक्षण करावे’

नवी दिल्लीः वाराणशीमधील काशी विश्वनाथ मंदिर व ज्ञानवापी मशीद वादप्रकरणात गुरुवारी एका द्रुतगती न्यायालयाने या धर्मस्थळांच्या परिसराचे भारतीय पुरातत्व

पीटर ब्रुक – महाभारताचा वैश्विक पट उलगडणारा रंगद्रष्टा
अतिवृष्टी जिल्ह्यांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज
कोविड-१९ वर परिणामकारक एचसीक्यूएसचा तुटवडा

नवी दिल्लीः वाराणशीमधील काशी विश्वनाथ मंदिर व ज्ञानवापी मशीद वादप्रकरणात गुरुवारी एका द्रुतगती न्यायालयाने या धर्मस्थळांच्या परिसराचे भारतीय पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करावे असे आदेश दिले. हे सर्वेक्षण भारतीय पुरातत्व खात्यातील ५ विख्यात पुरातत्व तज्ज्ञांकडून करण्यात यावे, यात एक पुरातत्व तज्ज्ञ अल्पसंख्याक समाजाचा असावा. या सर्वेक्षणाचा खर्च उ. प्रदेश सरकारने करावा असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ज्ञानवापी मशीद ही विश्वनाथ मंदिराचा एक भाग असल्याचा मुख्य दावा याचिकेत आहे.

बादशहा औरंजजेब याने काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग पाडून तेथे मशीद उभी केली असे याचिकाकर्त्यांचे मत आहे. पण प्रतिवादी पक्ष असलेल्या ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने हा दावा खोडून काढला आहे. त्यामुळे हे वादग्रस्त प्रार्थना स्थळ नेमके कोणत्या काळात रचले गेले, त्याच्या संरचनेत कोणी बदल केले, याचे ऐतिहासिक सत्य पुढे आले पाहिजे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

दरम्यान द्रुतगती न्यायालयाच्या या निर्णयाला वक्फ बोर्डने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे जाहीर केले आहे. हे धार्मिक स्थळ १९९१च्या धार्मिक स्थळ (विशेष तरतूद) कायद्यात येत असल्याने अयोध्या प्रकरण ५ न्यायाधीशांच्या घटनात्मक पीठाकडे देण्यात आले होते, त्यामुळे काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण आता न्यायालयात आव्हान देण्याजोगे राहिलेले नाही, असे वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0