वरवरा राव यांच्या जामिनास एनआयएचा विरोध

वरवरा राव यांच्या जामिनास एनआयएचा विरोध

कवी वरवरा राव हे आजारी असले, तरी त्यांना जामीन देण्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विरोध केला आहे.

अखेर वरावरा राव यांच्यावर नानावटीत उपचार
भीमा-कोरेगाव तपास एनआयएकडे
पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला – शरद पवार

कवी वरवरा राव हे आजारी असले, तरी त्यांना जामीन देण्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विरोध केला आहे.

७९ वर्षांचे कवी वरवरा राव हे मज्जा संस्थेच्या व्याधींनी आजारी आहेत. त्यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांना स्मृती भ्रंश झाल्याची लक्षणे दिसत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मे महिन्यामध्ये त्यांना आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर सरकारी जे जे रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात आणि आता खाजगी नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

असे असले तरी वरवरा राव यांना मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात लगेच उपचार करण्याची आवश्यकता नसल्याचा एनआयएचा दावा आहे.

राव यांच्यातर्फे अॅड. सुदीप पासबोला आणि अॅड. आर. सत्यनारायण यांनी राव यांना आजारी असल्याने जामीन मिळावा, असा अर्ज केला आहे.

‘वरवरा राव हे स्वतःच्या परिस्थितीचा गैर फायदा उठवीत आहेत,’ असे एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या १७२ पानी प्रतिज्ञा पत्रात म्हंटले आहे.

एल्गार परिषद- भीमा कोरेगाव प्रकरणांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून राव हे २०१८ मध्ये अटक झाल्यापासून तुरुंगात आहेत.

वरवरा राव कोविडच्या जागतिक साथीचा आणि स्वतःच्या वयाचा गैरफायदा घेत असल्याचे, पोलिस अधीक्षक आणि तपास अधिकारी विक्रम खलाटे यांनी एनआयएच्या वतीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे.

वैद्यकीय काळजी न घेतल्याने राव यांची तब्येत ढासळली असल्याचे राव यांचे कुटुंबीय आणि वकिलांनी वारंवार सांगितले आहे. राव यांचे बोलणे सुसंगत नसून, त्यांना कुटुंबीयांना ओळखण्यास अडचणी येत असल्याचे, त्यांची पत्नी हेमलता यांनी सांगितले. त्या दोनवेळा राव यांच्याबरोबर फोनवर बोलल्या होत्या. ते अजूनही तुरुंगात राहिल्यास, त्याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होईल, अशी भिती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

राव यांच्या कुटुंबियानी, जे जे रुग्णालयात राव एका ओल्या झालेल्या बेडवर दूरलक्षीत अवस्थेत पडून असल्याचे पाहिल्याचे सांगितले. त्या रुग्णालयात राव यांच्या डोक्याला मार लागला असून जखम झाली आहे. ते पाणी घेत असताना मार लागल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे.

हे सगळे म्हणजे, जामीनासाठी स्वतःच्या तब्येतीचा गैरफायदा घेणे असल्याचे, एनआयएचे म्हणणे आहे.

राव यांच्यासह १० जणांना पुणे पोलिसानी अटक करू त्यांच्यावर यूएपीए आतर्गत कर्स दाखल केली असून, त्यांच्यावर ‘अर्बन नक्सल’ म्हणून शिक्का मारण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: