विकास दुबे एन्काउंटरः उ. प्रदेश पोलिसांना क्लिनचीट

विकास दुबे एन्काउंटरः उ. प्रदेश पोलिसांना क्लिनचीट

नवी दिल्लीः कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या कथित एन्काउंटर प्रकरणात तीन सदस्यीय समितीने उ. प्रदेश पोलिसांना क्लिनचीट दिली आहे. दुबे यांचा एन्काउंटर

माहितीआयुक्तांना माहितीचा अधिकार आहे का?
‘ब्लाइंडनेस’ – आपली कृतिशून्यता जाणवून देणारी रुपककथा
पुराचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांचे राजकारण

नवी दिल्लीः कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या कथित एन्काउंटर प्रकरणात तीन सदस्यीय समितीने उ. प्रदेश पोलिसांना क्लिनचीट दिली आहे. दुबे यांचा एन्काउंटर करण्याचा कोणताही कट, बनाव रचला गेला नव्हता आणि हे एन्काउंटर बनाव असल्याचा कोणताही पुरावा पुढे आलेला नाही, असे समितीने म्हटले आहे.

या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. बी. एस. चौहान, अलाहाबाद उच्च न्यायालयातील माजी न्या. शशी कांत अग्रवाल व उ. प्रदेशचे माजी पोलिस महासंचालक के. एल. गुप्ता हे होते. या समितीने आपला अहवाल सोमवारी राज्य सरकारला सादर केला. अहवालाची एक पत्र सर्वोच्च न्यायालयातही सादर करण्यात येईल असे गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता यांनी या अहवालातील माहिती उघड केली नाही.

नेमके प्रकरण काय होते?

गेल्या वर्षी जूनमध्ये विकास दुबे याने उ. प्रदेश पोलिसातील ८ जणांना ठार मारले होते. कानपूर हत्याकांड म्हणून ओळखल्या जाणार्या या घटनेनंतर देशभर खळबळ माजली होती. या घटनेनंतर उ. प्रदेश पोलिसांनी १० जुलै रोजी विकास दुबेला मध्यप्रदेशात उज्जैन येथील महाकाल मंदिरात अटक केली होती. उत्तर प्रदेश एसटीएफने त्याला उज्जैनमधून ताब्यात घेऊन उत्तर प्रदेशात घेऊन जात होते. कानपूरमध्ये दाखल होताच, भौती या गावाजवळ विकासला घेऊन जाणारी गाडी उलटली. गाडी उलटल्यावर विकासने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसानी त्याला शरण येण्यास सांगितले. पण विकासने गोळीबार केल्याने झालेल्या चकमकीमध्ये तो मारला गेल्याचे पोलिसानी सांगितले.

दुबे उज्जैन येथील महाकाल मंदिरात जात असताना त्याला दोन सुरक्षा जवानांनी ओळखले व त्याची माहिती स्थानिक पोलिसांना त्वरित दिली गेली. पोलिस लगेचच आले व त्यांनी दुबेला पकडून त्याची ओळख विचारली. अखेर ओळख पटल्यानंतर ही बातमी वार्यासारखी पसरली.

दुबे याच्या अशा अनपेक्षित अटकेनंतर म. प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पोलिसांसाठी हे मोठे यश असल्याचे सांगत, विकास दुबे हा क्रूर मारेकरी असून तो म. प्रदेशात येण्याची शक्यता असल्याने सर्व पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला होता. त्याला पकडल्याची माहिती उ. प्रदेश पोलिसांना सांगितली असल्याचे ते म्हणाले होते.

दुबेला महाकाल मंदिरात पकडले का, असे विचारले असता मिश्रा म्हणाले, त्याला मंदिराच्या आवारात की बाहेर पकडले असे प्रश्न विचारू नका, त्याला उज्जैनमध्ये पकडण्यात आले असून मंदिरातील काही पुजारी व नागरिकांनी त्याचा चेहरा ओळखला व तशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांना त्याला अटक केली, असे सांगितले होते.

विकास दुबे याला मारल्यानंतर चकमकीबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. ही चित्रपटाची रचलेली संहिता असल्याची शंका अनेकांनी प्रकट केली होती.

दुबेला ठार मारण्याअगोदर ३ जुलै ते ९ जुलै दरम्यान त्याच्या टोळीतील पाच गुंडांचेही उ. प्रदेश पोलिसांनी एनकाउंटर केले होते. हे एनकाउंटर संशयास्पद अशी होते. कारण एनकाउंटर झालेल्या गुंडांनी कधीकाळी पोलिसांना मदत केली आहे, माहिती पुरवली होती.

मूळ बातमी