महाराष्ट्राचे विवेक चौधरी नवे हवाईदल प्रमुख

महाराष्ट्राचे विवेक चौधरी नवे हवाईदल प्रमुख

नवी दिल्ली:  महाराष्ट्राचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी गुरुवारी भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. एअर चीफ मार्शल आर. के. ए

२३ व्या दिवशीही काश्मीरमधील जनजीवन विस्कळीतच
३७० कलम : १४ नोव्हेंबरला याचिकांच्या सुनावण्या
३७० कलम रद्द केल्याचे अंतिम साध्य काय?

नवी दिल्ली:  महाराष्ट्राचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी गुरुवारी भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया हवाई दल प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले असून विवेक चौधरी यांनी त्यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.

विवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत. त्यांनी नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले व पुढे  पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. २९ डिसेंबर १९८२ रोजी ते हवाई दलात फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले.

त्यांनी या पूर्वी हवाई दलाचे उपप्रमुख तसेच हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे. हवाई दलात त्यांनी कमांड, स्टाफ आणि निर्देशात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचा ‘मिग’ आणि ‘सुखोई’ ही लढाऊ विमाने उडविण्याचा ३८०० तासांचा अनुभव आहे. हवाई दलाने राबविलेल्या सियाचीन येथील ‘ऑपरेशन मेघदूत’ आणि कारगिल युद्धातील ‘ऑपरेशन सफेद सागर’ या मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. हवाई दलातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी २००४ मध्ये हवाई दल पदक, विशिष्ट पदक, २०१५ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१ मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0