कारवाई काहीही करा; फायदा भाजपचाच!

कारवाई काहीही करा; फायदा भाजपचाच!

हरिद्वारला १७ ते १९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या तथाकथित धर्मसंसदेत झालेल्या भाषणांसाठी अन्य गुन्ह्यांसोबतच देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायलाच

सीबीआयची स्वायतत्ता धुळीला!
तटबंद्यांना लोकशाहीत जागा नाही!
राकेश अस्थाना यांच्या नियुक्तीची याचिका फेटाळली

हरिद्वारला १७ ते १९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या तथाकथित धर्मसंसदेत झालेल्या भाषणांसाठी अन्य गुन्ह्यांसोबतच देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा होता. मात्र, पोलिसांनी केवळ  भारतीय दंड संहितेच्या १५३ अ कलमाखाली (गटांमध्ये शत्रुत्वाला बढावा देणे) गुन्हा नोंदवून आयोजकांवर कृपा केली.

नुकताच हिंदूधर्माचा स्वीकार केलेल्या जितेंद्र नारायण सिंग त्यागी (पूर्वीचे नाव वसीम रिझवी) यांच्या आणि काही अज्ञात व्यक्तींच्या विरोधात प्रथम गुन्हा नोंदवण्यात आला. आता पोलिसांनी धर्मदास आणि अन्नपूर्णा यांची नावेही फिर्यादीत समाविष्ट केल्याचे समजते.

आणखी धर्मसंसदांची घोषणा

अशा अनेक धर्मसंसदा आखण्यात आल्या आहेत, असे पत्रकार आलिशान जाफरी यांनी २६ डिसेंबर रोजी ट्विट केले. त्याच दिवशी क्यों जरूरी है धर्मसंसद’ अशा शीर्षकाचा व्हिडिओ स्वामी अमृतानंद’ नावाच्या चॅनलद्वारे यूट्यूबवर अपलोड झाला. यात जीएनटी-आज तकच्या लोगोखाली यती नरसिंहानंद यांची मुलाखत घेण्यात आली होती. पुढील धर्मसंसद १ जानेवारी, २०२२ रोजी गाझियाबाद येथे होणार आहे, तर २३  जानेवारी, २०२२ रोजी अलीगढ येथे होणार आहे, असे नरसिंहानंद यात म्हणत आहेत. त्यानंतरच्या धर्मसंसदा हिमाचल प्रदेश व कुरूक्षेत्र येथे होणार आहेत असेही यात म्हटले आहे. पहिली धर्मसंसद ६-७ सप्टेंबर, २०१२ रोजी देवबंद येथे घेण्यात आली होती व त्याला ३०,००० लोक उपस्थित होते, असा दावा नरसिंहानंद यांनी केला आणि त्यावेळी अखिलेश यादव सरकारने आपल्याला अटकही केली होती असे त्यांनी सांगितले. तेव्हापासून दर सहा महिन्यांनी धर्मसंसदा आयोजित केल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

धर्मसंसदांमागील हेतू नरसिंहानंदांच्या शब्दांत

या मुलाखतीत नरसिंहानंद यांनी त्यांची मते व कार्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. या संसदांमागील प्रमुख हेतू हिंदू धर्माचे रक्षण करणे; हिंदूंविरोधात पुकारण्यात आलेल्या इस्लामी जिहादाबाबतचे ‘सत्य’ हिंदूंना सांगणे; त्यांना आत्मसंरक्षणासाठी व जिहादविरोधात लढण्यासाठी तयार करणे हे आहेत, असे ते म्हणाले. सरकार हिंदूंना वाचवू’ शकणार नाही आणि जिहादचा धोका केवळ भारताला नव्हे, तर संपूर्ण जगाला आहे असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

हिंदूंना धोका आहे’ हा मुद्दा स्पष्ट करण्यास सांगितला असता, आपली हत्या करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत, असे नरसिंहानंदांनी नमूद केले आहे. गेल्या तीन वर्षांत सहा हिंदूंची मुस्लिमांनी हत्या केली आणि त्यांच्या मुलींची आयुष्ये बिघडवली, असा दावाही त्यांनी केला. हे १४०० वर्षांपासून चालत आलेले आहे. इस्लामी जिहाद म्हणजे संघटित गुन्हेगारी आहे. इस्लाम ही गुन्हेगारांनी तयार केलेली टोळीच आहे आणि मुस्लिमधर्मीय केवळ त्यांच्या पवित्रग्रंथात लिहिले आहे तसेच वागतात, असेही ते म्हणाले. त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये हिंदूंना ठार करा, त्यांच्या स्त्रियांना लुटा व मुलांना पळवा असे लिहिले आहे, असा दावाही नरसिंहानंदांनी केला. पोलीस याबाबत काहीही करत नाहीत, मुस्लिम लोक हिंदूंना साक्ष देण्यापासून अटकाव करतात, माध्यमे याकडे दुर्लक्ष करू शकतात, ‘आम्ही’ करू शकत नाही, असेही ते पुढे म्हणाले.

हिंदू प्रतिकार करतील, ते लढतील व स्वत:चे संरक्षण करतील असे नरसिंहानंदांनी जाहीर केले. साधूंनी संरक्षणासाठी लढले पाहिजे आणि गरज भासल्यास प्राणही त्यागले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. आपल्याला जिहादी  ठार करतील त्या दिवसाची प्रतीक्षा आपण करत आहोत, कारण, आज आपण एक व्यक्ती आहोत पण मृत्यूनंतर एक विचारहोऊ असे ते म्हणाले. हिंदू धर्म त्यागाची मागणी करतोच, असेही त्यांनी नमूद केले.

धर्मसंसदांचे लागोपाठ आयोजन कशासाठी?

धर्मसंसदा पूर्वी दर सहा महिन्यांनी घेतल्या जात होत्या असे नरसिंहानंदांनीच सांगितले आहे. मग आता एवढ्या लागोपाठ धर्मसंसदा आयोजित केल्या जाण्याचे कारण काय? आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या उत्तरप्रदेशात धर्मसंसदा का? असे प्रश्न उपस्थित होतात.

नरसिंहानंदांच्या मते हिंदू धर्माला इस्लामच्या रचनेपासून धोका आहे; इस्लाम दीर्घकाळापासून हिंदूविरोधी योजना आखत आहे. अर्थात अलीकडील काळात देशात कोणतीच असामान्य घटना झालेली नाही, त्यामुळे धोक्याचे कारण आत्ता दिसत नाही.  आपल्या धर्माच्या भवितव्याची चिंता आपल्याला वाटते असे कोणी जाहीर केल्यास, त्यावरून त्या व्यक्तीवर काही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही, हे सत्य आहे. तरीही हिंदूंचा १४०० वर्षांपासून छळ होत आला आहे आणि स्वातंत्र्यप्राप्तीपासून या विरोधात काही झाले नाही हा नरसिंहानंदांचा दावा विचारात घेतला, तर नेमकी आत्ताच धर्मसंसदांच्या आयोजनात वाढ का झाली हा मुद्दा उरतोच.

केवळ मतांचे राजकारण

या सगळ्या बाबी विचारात घेता, धर्मसंसदांचा आत्ताच सुळसुळाट होण्यामागे, हिंदू मतांचे धृवीकरण हेच भाजपचे संभाव्य उद्दिष्ट दिसते. जातीपातींच्या पलीकडे जाऊन हिंदू मतांचे एकत्रीकरण करण्याच्या उद्देशानेच हे चालले असावे. जातींच्या आधारावर हिंदू मतांचे विभाजन हा उत्तरप्रदेशात भाजपला सतावणारा प्रमुख चिंतेचा मुद्दा आहे. कारण, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या पक्षांचा जनाधार प्रामुख्याने जातींवर आधारित आहे.

अशा परिस्थितीत हिंदुत्ववादी गटांच्या डोक्यांत दोन योजना असू शकतात: पहिली म्हणजे देशातील मुस्लिमांपैकी काहींना बेजबाबदार विधाने करण्यास उद्युक्त करणे. विशिष्ट मुस्लिम नेत्यांच्या सुडाचा वास येणाऱ्या विधानांची सोशल मीडियावर आधीच गर्दी आहे. यातील बहुतेक विधाने विपर्यस्त असल्याने मी त्यांची उदाहरणे येथे देत नाही.

भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात, काही मुस्लिम व्यक्ती काहीतरी प्रक्षोभक बोलणार आणि त्याचा वापर हिंदुत्ववादी लोक बघा मुस्लिम कसे असतात ते’ असे सर्वांना सांगण्यासाठी करणार हे अगदीच साहजिक आहे. मुस्लिमांच्या विधानांचा फायदा घेऊन हिंदू मतांचे एकत्रीकरण केले जाऊ शकते.

दुसरी योजना म्हणजे हिंदुत्ववादी नेत्यांना अटक करण्यास सरकारला भाग पाडणे. या अटकेचे रूपांतर दृश्य माध्यमांच्या मदतीने समारंभांत करणे सहज शक्य आहे. हे नेते अटकेपूर्वी काही विधाने करू शकतात आणि धर्मसंसदांमध्ये होणाऱ्या भाषणांचा प्रभाव या मार्गाने साधला जाऊ शकतो. या क्लिप्स नंतर व्हॉट्सअॅप व अन्य सोशल मीडियावर फिरवून, आपल्या नेत्यांनी धर्मरक्षणासाठी कसे बलिदान केले असे चित्र निर्माण केले जाऊ शकते. शिवाय हिंदूंना इस्लाम या सामाईक संकटाविरोधात उभे राहण्यासाठी आवाहनही केल्यासारखे होईल. आणि हिंदूंना तरी या आवाहनला प्रतिसाद देण्यासाठी भाजपला मतदान करण्याहून अधिक चांगला मार्ग कुठे सापडेल?

गाझियाबाद येथे आयोजित धर्मसंसदेला प्रशासन कदाचित परवानगी देणार नाही, असे नरसिंहानंद मुलाखतीत म्हणाले. निवडणुका तोंडावर असताना हे शक्य आहे. मथुरा जिल्हा प्रशासनाने श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तिदलाला ६ डिसेंबर रोजी जनसभा घेण्यास परवानगी नाकारली होती.  कायदा व सुव्यवस्था उत्तम राखल्याचा दावा कमकुवत होणार नाही यासाठी राज्य सरकार डोळ्यात तेल घालून काळजी घेणार हे नक्की. जर त्यांनी या धर्मसंसदेला परवानही दिली, तर त्यामुळे हिंदू मतांचे एकत्रीकरण होण्यात मदत नक्कीच मिळेल.  अर्थात परवानगी नाकारली गेली तरी त्याचे भांडवल धर्मसंसदेचे आयोजक बरोबर करून घेतील. ते त्यांचा प्रचार यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअॅप व तत्सम माध्यमांद्वारे करून घेतील आणि दुसऱ्या बाजूला सरकारलाही समतोल भूमिकेची बतावणी करणे शक्य होईल.

अशा रितीने त्यांनी विरोधी पक्षांचे कोणत्याही बाजूने नुकसानच होईल, अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करा, त्याचा भाजपला निवडणुकीच फायदाच होणार. जातींच्या पलीकडे जाऊन हिंदू मतांचे एकत्रीकरण यामुळे होईलच.

डॉ. एन. सी. अस्थाना हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0