एका नवीन अभ्यासात म्हटले आहे, वॉल स्ट्रीट, सिटी ऑफ लंडन आणि इतर बँकिंग केंद्रातील वित्तदाते यांनी जगभरात गुलामासारख्या स्थितीत काम करणाऱ्या कोट्यवधी लोकांना मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे.
वॉल स्ट्रीट, सिटी ऑफ लंडन आणि इतर बँकिंग केंद्रातील वित्तदाते यांनी जगभरात गुलामासारख्या स्थितीत काम करणाऱ्या कोट्यवधी लोकांना मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असे एक नवीन अभ्यास म्हणतो.
फायनान्शियल सेक्टर कमिशन ऑन मॉडर्न स्लेवरी अँड ह्यूमन ट्रॅफिकिंग या नावाचा तज्ञांचा गट म्हणतो, बँका आणि इतर वित्तीय संस्था अशी धोरणे राबवू शकतात, ज्यामुळे वेठबिगारांसारखे काम करणारे ४ कोटींहून अधिक पुरुष, स्त्रिया आणि मुलांची त्यातून सुटका होऊ शकते.
Unlocking Potential: A Blueprint for Mobilising Finance Against Slavery and Trafficking, या त्यांच्या १७२ पानांच्या अहवालात त्यांनी माणसांचाव्यापार करणाऱ्या जाळ्यांच्या बाबतीत अधिक वित्तीय तपास करावा आणि गुलामांसारख्या स्थितीतून मुक्त झालेल्यांना अधिक सहाय्य करावे असे आवाहन केले आहे.
“माणसांना गुलाम बनवणे आणि माणसांचा व्यापार हे मोठे व्यवसाय आहेत. तरुण आणि म्हाताऱ्यांच्याही सोललेल्या पाठी, तुटलेली हृदये आणि भंगणारी स्वप्ने यातून दर वर्षी १५० अब्ज डॉलर निर्माण होत असतात असा अंदात आहे,” असे डच परराष्ट्र मंत्री स्टेफ ब्लोक यांनी म्हटले आहे. ते या अहवालाच्या कामात सामील होते.
या अहवालात आधुनिक गुलामगिरीचे भयावह चित्र रंगवले आहे. यामध्ये जगभरात १८५ पैकी १ व्यक्तीला या बेकायदेशीर क्षेत्रामार्फत गुलाम बनवले जाते. याची तुलना केवळ बेकायदेशीर मादक पदार्थ आणि नकली वस्तूंच्या व्यापाराशीच केली जाऊ शकते.
गुलामगिरीच्या आधुनिक रूपांमध्ये कर्जासाठी ठेवलेले वेठबिगार, जबरदस्तीने लावलेली लग्ने, घरगुती नोकर, आणि हिंसा किंवा दहशतीच्या जोरावर सक्तीने बनवलेले मजूर यांचा समावेश होतो. हे आधुनिक गुलाम भीक मागण्यापासून ते सोन्याच्या खाणीतून सोने काढण्यापर्यंत सर्व काही करतात पण सर्वात मोठी क्षेत्रे आहेत घरकाम, वस्तू उत्पादन आणि बांधकाम. या क्षेत्रांमध्ये मानवी व्यापाराचा जागतिक स्तरावर वार्षिक १५० अब्ज डॉलरचा व्यवसाय आहे. यापैकी एक चतुर्थांश मुले असतात.
जेम्स कॉकेन हे अहवालाचे एक सहलेखक आहेत आणि युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटीमध्ये धोरण विश्लेषक आहेत. ते म्हणाले, मानवी व्यापार आणि गुलामगिरी हे “बाजारपेठेचे दुःखद अपयश आहे.”
“आधुनिक गुलामगिरीमुळे जागतिक संपदा कमी होते, कारण यामध्ये लोकांना संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक घटकांऐवजी विक्रेय वस्तूसारखे वागवले जाते,” कॉकेन म्हणाले. “आपण एकत्रितपणे प्रचंड प्रमाणात मानवी क्षमता वाया घालवतो.”
हा एक अभिशाप आहे आणि त्याच्याशी संघर्षच करावा लागेल, असे हा अहवाल म्हणतो. २०३० पर्यंत जर या शोषित कामगारांची संख्या शून्यावर आणायची असेल तर पुढची ११ वर्षे दररोज या आधुनिक गुलामगिरीच्या १०,००० पीडितांना त्यातून मुक्त करावे लागेल.
हे ध्येय गाठण्यामध्ये वित्तीय संस्था मदत करू शकतात. त्या या लोकांची वाहतूक करणाऱ्या जाळ्यांचा वित्तीय तपास करण्यासाठी आणखी संसाधने पुरवू शकतात, तसेच गुलामांच्या व्यापारामधून नफा कमवणाऱ्या संस्थाचा पर्दाफाश करू शकतात, असेही अहवालाच्या लेखकांना वाटते. माणसांचा व्यापार करणाऱ्या जाळ्यांशी जोडलेल्या बेकायदेशीर रोकड देवाणघेवाण ओळखण्यामध्ये बँका मोठी भूमिका बजावू शकतात. जगातल्या सर्वात असुरक्षित लोकांच्या शोषणाशी लढण्यासाठी त्या इतर संस्थांबरोबर सहकार्य करू शकतात.
लोकांना गुलाम करण्याबरोबरच, मानवी तस्करी करणारे माफिया, त्यांची शिकार झालेल्यांची वित्तीय ओळख चोरून त्यांचा उपयोग पैशांच्या गैरव्यवहारासाठीही करतात. या जाळ्यातून सुटल्यानंतर या पीडितांना याचाही सामना करावा लागतो.
आपल्या मायक्रोफायनान्स योजनेसाठी शांतता नोबेल पारितोषक मिळालेले मुहम्मद युनुस म्हणतात, गरीब लोकांचा या मानवी तस्करांपासून बचाव करण्यासाठी बँकांनी डिजिटल आणि सामाजिक वित्त योजनांमध्ये अधिक गुंतवणूक करावी.
“जगभरातील कित्येक लोक बँकांच्या व्यवस्थेच्या बाहेरच आहेत,” युनुस म्हणाले.
“आपण व्यवसायांना सामाजिक व्यवसाय बनवले पाहिजे, असे व्यवसाय जे वैयक्तिक आर्थिक लाभांच्या मागे न लागता सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी समर्पित असतील. ते मानवी व्यापार आणि आधुनिक गुलामगिरी कमी करण्यावर आणि अंतिमतः नष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करतील.”
या अहवालाचे काम लीशटेनस्टीन उपक्रमाद्वारे संचालित करण्यात आले. ही बार्कलेज, बँक ऑफ अमेरिका, एचएसबीसी, वेल्स फार्गो, बीएमओ फायनान्शियल ग्रुप आणि इतर सुप्रसिद्ध फायनान्स ब्रँडच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून तयार झालेली संस्था आहे.
“वित्तीय क्षेत्राकडे आधुनिक गुलामगिरी आणि मानवी व्यापार थांबवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेची सचोटी कायम टिकवण्यासाठी मदत करण्याची प्रचंड क्षमता आहे,” ब्लॉक पुढे म्हणाले.
“ते नैतिक भांडवल बाजारांची निर्मिती करू शकते, आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी घडवण्यामागचा सशक्त ताकद बनू शकते. सर्वात आधी ते या गुन्हेगारी व्यवसायांच्या पीडितांना आधार देण्याचे काम करू शकते.”
(IPS)
मूळ लेख
COMMENTS