कोलकाताः दोन आठवड्यांपूर्वीच प. बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७५ लाख रोजगार कार्ड वाटण्याची मोहीम भाजपने मागे घेतली आहे. ही मोहीम भाज
कोलकाताः दोन आठवड्यांपूर्वीच प. बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७५ लाख रोजगार कार्ड वाटण्याची मोहीम भाजपने मागे घेतली आहे. ही मोहीम भाजपने १३ डिसेंबरला सुरू केली होती. राज्यात या मोहिमेच्या माध्यमातून भाजपने आपला प्रचार सुरू केला होता. पण अचानक ही मोहीम मागे घेण्यामागील कारण स्पष्ट करताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष व खासदार दिलीप घोष यांनी रोजगार या शब्दात अनेक अडचणी असून अनेकांना वाटले, असे रोजगार कार्ड मिळाल्यास नोकरी मिळेल. वास्तविक आम्हाला राज्यातील बेरोजगारीचा स्तर अभ्यासावयाचा होता व त्यावर आधारित रोजगार धोरण आखायचे होते. पण आमच्या रोजगार आश्वासन कार्डमुळे रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारवरच पडेल असा समज झाला होता. रोजगार खासगीही असू शकतात किंवा स्वयंरोजगारही असू शकतात. जनतेमध्ये चुकीची माहिती जाऊ नये म्हणून ही मोहीम मागे घेत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
भाजपकडून रोजगार आश्वासन कार्ड हे राज्यातील सर्व २९४ विधानसभा मतदारसंघातल्या बेरोजगारांना वाटले जाणार होते. आणि १३ डिसेंबरला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका करताना राज्यात रोजगारवृद्धी करणारी गुंतवणूक झाली नसल्याचा दावा केला होता. राज्यात सिंडिकेट राज असल्याने उद्योजक बंगालला पसंती देत नसल्याचाही त्यांनी आरोप केला होता,
आगामी विधानसभा निवडणुकांत भाजप बेरोजगारीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करणार असल्याने रोजगार कार्ड मोहिमेचा बराच बोलबाला झाला होता.
ळ बातमी
COMMENTS