फॅसिझम, झुंडशाहीच्या विरोधात बंगाली कलाकार एकवटले

फॅसिझम, झुंडशाहीच्या विरोधात बंगाली कलाकार एकवटले

कोलकाताः प. बंगाल विधानसभा निवडणुका जवळ येत असताना चित्रपट, नाट्य व संगीत क्षेत्रातील कार्यरत अनेक बंगाली कलावंतानी फॅसिझम शक्तींना राजकारणात थारा देऊ

महुआ मोईत्रा : १० मिनिटांचे तडफदार भाषण
ममता- राज्यपाल धनखड मतभेद चिघळले; ट्विटरवर ब्लॉक
बंगाल विधानसभाही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात

कोलकाताः प. बंगाल विधानसभा निवडणुका जवळ येत असताना चित्रपट, नाट्य व संगीत क्षेत्रातील कार्यरत अनेक बंगाली कलावंतानी फॅसिझम शक्तींना राजकारणात थारा देऊ नये त्यांना उध्वस्त करावे असे आवाहन करणारे एक गाणे प्रसिद्ध केले आहे. गेल्या मंगळवारी यू ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर हे गाणे प्रसिद्ध करण्यात आले. काही तासातच या गाण्याला लाखो नेटिझनही पसंती दिली. या गाण्यात कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू वा त्यांचा प्रचार करण्यात आलेला नाही पण देशात सध्या फॅसिझम, झुंडशाहीचे, समाजात दुही माजवणारे राजकारण सुरू आहे, त्याला मतदानाच्या माध्यमातून रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे गाणे एनआरसी-सीएए या मुद्द्यांबरोबर देशातील वाढती बेरोजगारी, धार्मिक हिंसाचार, फुटीरतावादी राजकारण, दमनकारी यंत्रणा, वाढत्या लोकशाही-राज्यघटनांविरोधी शक्ती अशा मुद्द्यांवर केंद्रीत आहे. हे गाणे प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर वेगाने पसरले आहे.

‘निजेदेर मोते निजेदेर गान’ म्हणजे ‘आमच्या विचारांसारखेच आमचे गाणे’, असा अर्थ असलेले हे गाणे प्रसिद्ध बंगाली अभिनेता अनिर्बान चटर्जी यांनी लिहिलेले असून त्याचे दिग्दर्शन रिद्धी सेन व रवितोब्रोतो मुखर्जी यांनी केले आहे. या व्हीडिओत परमब्रत चटर्जी, सब्यसाची चटर्जी, रुद्रप्रसाद सेनगुप्ता, अनुपम रॉय, रुपांकर बागची व सुमन मुखोपाध्याय सारखे प्रसिद्ध बंगाली कलाकार आहेत.

या गाण्यामधील एक ओळ ‘अमी अनयो कोठाओ जबोना, अमी ई देशे तेई थबको’ अशी आहे. याचा अर्थ ‘मी कधीच व कुठेही जाणार नाही, हा देश माझा आहे व मी इथेच राहणार आहे,’ असा आहे.

या गाण्यात रवींद्रनाथ टागोर, चार्ली चॅप्लिन, डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचे संदर्भ आहे. तसेच देशात विद्यार्थ्यांवरचे होणारे हल्ले, निदर्शने चिरडण्याचे प्रयत्न, शेतकरी आंदोलन, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, झुंडशाही यांचेही संदर्भ गाण्यात आहेत.

गाण्यातले एक कडवे प्रसिद्ध गीतकार फैज अहमद फैज यांच्या ‘हम देखेंगे’चे समाविष्ट करण्यात आले आहे.

हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होताच, त्याचे स्वागत प्रसिद्ध दिग्दर्शक हन्सल मेहता, अनुभव सिन्हा, ऋचा चढ्ढा या हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0