लडाखमधील गलवान खोर्यात गेल्या सोमवारी व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेच्या निमित्ताने दोन्ही दे
लडाखमधील गलवान खोर्यात गेल्या सोमवारी व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेच्या निमित्ताने दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. सैनिकांच्या या हाणामारीत अनेक वृत्तवाहिन्यांनी चीनचे ४३ सैनिक ठार किंवा जखमी झाल्याचे म्हटले होते. पण या आकड्याला चीनकडून अद्याप पुष्टी मिळालेली नाही. भारताच्या लष्कर प्रशासनाने मात्र २० जवान शहीद झाल्याचे जाहीर केले होते.
गलवान खोर्यातील संघर्षात चीनचे किती सैनिक ठार झाले यासंदर्भात अनेक वृत्ते येत असून जेव्हा या घटनेसंदर्भात माहिती येत जात होती तेव्हा काही वृत्तसंस्थांनी चीनचे ५ सैनिक ठार तर ११ जखमी झाल्याचे सांगितले होते. पण हा आकडे अनधिकृत होता.
१७ जूनला टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने एक ब्रेकिंग न्यूज देत चीनने आपले ३० जवान ठार झाल्याचे मान्य केले असे वृत्त दिले. हे वृत्त ग्लोबल टाइम्सने दिल्याचे टाइम्स नाऊचे म्हणणे होते. पण हे ट्विट नंतर काढून घेण्यात आले.
पण नंतर टाइम्स नाऊचे दोन वृत्तनिवेदक राहुल शिवशंकर व नाविका कुमार यांनी लडाखमध्ये ठार झालेल्या ३० चिनी सैनिकांची नावे वाचून दाखवली. पण ही नावे ग्लोबल टाइम्सने खोटी प्रसृत केली असतील असे नाविका कुमार यांनी सांगितले.
सोशल मीडियात खोटी माहिती प्रसवणारे प्रशांत पटेल उमराव यांनी त्यांच्या ट्विटरवर ३० चिनी सैनिक मारले गेल्याचे सांगितले.
त्यानंतर अनेक फेसबुक व ट्विटर अकाउंटवरून ३० चिनी सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात आले. या दाव्याला या अकाउंटनी चीनच्या पश्चिम विभागाच्या कमांडच्या प्रवक्त्याने ३० चिनी सैनिक मारले गेल्याची कबुली दिल्याचे प्रमाणपत्र दिले गेले. या ३० चिनी सैनिकांची नावेही अशा अकाउंटनी प्रसिद्ध केली. हीच नावे टाइम्स नाऊने सांगितली.
चीनचे ३० सैनिक मारले गेल्याचे ट्विट निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्क्षी यांनीही रिट्विट केले. हे बक्षी टाइम्स नाऊच्या चर्चेच नेहमी सामील असतात.
मंगळवारी संध्याकाळी ६.४० मिनिटांच्या बातम्यांमध्ये टाइम्स नाऊने ३० चिनी सैनिक लडाखमध्ये मारले गेल्याचे सांगितले आणि ६.४९ मिनिटांनी तसे ट्विट त्यांनी प्रसिद्धही केले.
अल्ट न्यूजकडे संध्याकाळी ५.४३ मिनिटांनी या आकड्याविषयी विचारणा करणारे मेसेज आले. ३० चिनी सैनिक मारले गेल्याचे वृत्त chinanews.com या साइटवरून आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या साइटवर असा काहीच उल्लेख नव्हता.
अल्ट न्यूजने ग्लोबल टाइम्सची वेबसाइट व ट्विटर पेजवर जाऊन पाहिले असता या वृत्तसंस्थेने चिनी सैनिकांचा आकडा प्रसिद्धच केला नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचे शेवटचे ट्विट भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांदरम्यान दूरध्वनी संभाषणासंदर्भात होते. ग्लोबल टाइम्सच्या वेबसाइटवर ३० मृत चिनी सैनिकांची नावे मिळाली नाहीत.
अद्याप चीन सरकारने अधिकृतपणे आपले किती सैनिक जखमी वा मृत झाले आहेत, याचा आकडा प्रसिद्ध केलेला नाही. हे वृत्त ग्लोबल टाइम्सचे संपादक हू क्षीजिन यांनी ट्विटरवर सांगितले.
४३ मृत चिनी सैनिकांचा आकडा हा केवळ एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केला होता. तर अमेरिकी गुप्तचर सूत्रांनी जखमी सैनिकांचा आकडा ३५ असल्याचे सांगितल्याचे एएनआयचे म्हणणे होते. एएनआयने या संदर्भात usnews.com चे नाव घेतले. पण प्रत्यक्षात एकाही प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम करणार्या पत्रकाराने ४३ आकड्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. तसेच भारत व चीन सरकारने अधिकृतपणे चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचे अद्याप सांगितलेले नाही.
मूळ वृत्त अल्ट न्यूजवर प्रसिद्ध
COMMENTS